घरमहाराष्ट्रहा दाऊद वानखेडे कोण?; फोटो शेअर करत नवाब मलिकांचा सवाल

हा दाऊद वानखेडे कोण?; फोटो शेअर करत नवाब मलिकांचा सवाल

Subscribe

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील दाऊद वानखेडे असल्याचा दावा केला. नवाब मलिक यांनी सोमवारी जन्माचा दाखला शेअर केला. दरम्यान, मलिक यांनी एक पुन्हा एकदा एक फोटो शेअर करत हा दाऊद वानखेडे कोण? असा सवाल केला आहे.

नवाब मलिक यांनी ट्विटरवर एका फेसबुकचा प्रोफाईल फोटो शेअर केला आहे. यामध्ये एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांचं छायचित्र दिसत आहे. परंतु, त्यावर वानखेडे दाऊद असं लिहिलं आहे. या फोटोमुळे ज्ञानदेव वानखेडे की दाऊद वानखेडे या संभ्रमात आणखीनच भर पडली आहे.

- Advertisement -

समीर वानखेडेंच्या वडिलांनी आरोप फेटाळले

नवाब मलिक यांनी समोर आणलेलं प्रमाणपत्र हे खोटं की बनावट आहे हे मला माहीत नाही. समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाबाबतही त्यांच्या वडिलांनी भाष्य केलं आहे. तो फोटो बरोबर आहे. नियमानुसार घटस्फोट देखील झाला आहे. त्यात काही चुकीचं नाही, असं समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. माझे नाव ज्ञानदेव कचरू वानखेडे आहे दाऊद नाही. हे कोणीतरी केलं असेल किंवा लिहिलं असेल, याच्याबद्दल माहिती नाही. पण माझं खरं नाव ज्ञानदेव कचरू वानखेडे आहे.

- Advertisement -

माझ्याकडे शाळा सोडल्याचा दाखला, पदवीचे प्रमाणपत्र, हिंदू पद्धतीने लग्न केल्याचं प्रमाणपत्र आहे. त्यानंतरही प्रश्न कुठून उद्भवतात हे मला समजत नाही, असं समीर वानखेडेंच्या वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. तुम्ही नावात बदल केला म्हणून प्रमाणपत्रावर दाऊद असं नाव असल्याचं सांगितलं जात आहे असं विचारल्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. हे सर्व खोटं आहे. कोणीतरी बनावट पद्धतीने हे केलं आहे. सर्व कागदपत्रांवर मुलाचंही नाव समीर ज्ञानदेव वानखेडे असंच आहे. समीर वानखेडेच्या पहिल्या पत्नीच्या मुलाच्या जन्म प्रमाणपत्रावरही समीर ज्ञानदेव वानखेडे असाच उल्लेख आहे, असं समीर वानखेडेंचे वडील म्हणाले. प्रकरण संपल्यानंतर त्याला राजीनामा द्यायला सांगू. तो वकील आहे. देशाची सेवा करण्याची जिद्द आहे म्हणून तो हे काम करत आहे. त्याच्यावर हल्ला झाला तरी हे सरकार काही करत नाही, असं समीर वानखेडेंचे वडील म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -