घरमहाराष्ट्रWho Is Dhangekar कोल्हापुरातून उत्तर, चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचले!

Who Is Dhangekar कोल्हापुरातून उत्तर, चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचले!

Subscribe

कोल्हापूर : नुकत्याच पार पडलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर यांनी भाजपाच्या हेमंत रासने यांना धुळ चारली.

पुण्यात भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पोटनिवडणुकीत यावेळी महाविकास आघाडीचा विजय झाल्यानंतर भाजपावर जोरदार टीका झाली. ही टीका होत असतानाच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसब्यातील प्रचारादरम्यान Who Is Dhangekar ही टीका केली होती. या टीकेनंतर पुण्यात आणि कोल्हापूरात बॅनरच्या माध्यमातून चंद्रकांत पाटलांना पुन्हा एकदा डिवचण्यात आले.

- Advertisement -

This is Dhangekar या बॅनरच्या माध्यमातून चंद्रकांत पाटलांना पुन्हा एकदा डिवचण्यात आले आहे. This is Dhangekar हा बॅनर कोल्हापूर शहरातील कावळा नाका चौक परिसरात लावण्यात आला असून या बॅनरची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती. या पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये चुरशीची लढाई झाली आणि महाविकास आघाडीचे नेते रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –https://www.youtube.com/shorts/HsAq-xPUmKY

गेल्या 28 वर्षापासून बालेकिल्ला असणाऱ्या भाजपला निवडणूक अवघड का गेली याचे आत्मचिंतन करण्याची भाजपला गरज आहे. मात्र या पोटनिवडणुकीसाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कसब्यात तळ ठोकून होते.

भाजपचा बालेकिल्ला आपल्याकडे ठेवण्यासाठी चंद्रकांत पाटलांसोबत भाजपचे मोठे नेते प्रचाराच्या मैदानात उतरल्याचे पहायला मिळाले. कसब्यात हेमंत रासने वि. रविंद्र धंगेकर अशी लढत जरी असली तरी खरी लढत ही भाजप वि. काँग्रेस रंगली होती. प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना कसब्यात लहान बॅनरची जोरदार चर्चा रंगली होती. मध्यरात्री कसब्यातील वाडे, सोसायटी तसेच मोकळ्या जागेवर लहान लहान बॅनर लावण्यात आले होते. यावर “इथे सोने, चांदी, पैसे इ. सर्वकाही स्वीकारले जाईल. टीप, मत मात्र रवी धंगेकरलाच दिले जाईल. यंदा कसब्यात धंगेकरच” तसेच “कोणी कितीही म्हटले, तुमचे काम मार्गी लावतो पण सर्वांना माहितीय वेळेला फक्त रवीभाऊच धावतो! त्यामुळे आम्हाला कुठलीही आमिषे दाखवू नयेत.” अशा आशयाचे बॅनर पोटनिवडणुकी आधीच झळकले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -