घर महाराष्ट्र कोण कुणाकडे पाहतोय आणि..., भाजपा नेते आशिष शेलार यांची 'इंडिया'वर बोचरी टीका

कोण कुणाकडे पाहतोय आणि…, भाजपा नेते आशिष शेलार यांची ‘इंडिया’वर बोचरी टीका

Subscribe

मुंबई : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि विरोधकांच्या ‘इंडिया’ने (INDIA) जोरदार तयारी सुरू केली आहे. विरोधकांच्या या आघाडीची तिसरी बैठक मुंबईत 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर अशी दोन दिवस होणार आहे. याचे होर्डिंग सर्वत्र लागले आहेत. यावरून भाजपा आमदार Adv. आशिष शेलार यांनी ‘अशी ही बनवा बनवी’ सिनेमाचा संदर्भ देत जोरदार टीका केली आहे.

- Advertisement -

भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी ‘अब की बार मोदी सरकार’चा नारा देत 2014मध्ये केंद्रात सत्तेवर आल्यानंतर 2019मध्येही रालोआने निर्विवाद बहुमत मिळविले. या निवडणुकीत विरोधकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला, परंतु कोलकात्यातील रॅलीच्या पुढे त्यांची ही एकी टिकलीच नाही. त्या निवडणुकीला प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे सामोरा गेला. त्यामुळे रालोआला तसा विरोध झाला नाही.

हेही वाचा – अयोध्या राम मंदिर उद्घाटनावेळी…, संजय राऊतांकडून भीती व्यक्त; ‘इंडिया’च्या बैठकीत करणार चर्चा

- Advertisement -

आता 2024च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात हुकूमशाही येत असल्याचा आरोप करत विरोधकांनी आता एकजूट दाखविली आहे. 23 जून 2023 रोजी विरोधकांची पहिली बैठक बिहारमधील पाटणा येथे झाली. त्या बैठकीला 15 विरोध पक्ष उपस्थित होते. त्यानंतर दुसरी बैठक 18 जुलै 2023 रोजी बंगळुरूमध्ये झाली. या बैठकीत 26 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीचे ‘इंडिया’ असे नामकरण करण्यात आले.

आता या आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीत आघाडीच्या चिन्हावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. इंडियाच्या लोगोमध्ये या देशाचा रंग असणार आहे. तसेच, या देशातील एकतेचा रंग असेल, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. या बैठकीसंदर्भातील होर्डिंग ठिकठिकाणी लागले आहेत. त्यावरून मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी बोचरी टीका केली आहे.

हेही वाचा – CAG : “जे आडवे जातात त्यांना संपवण्यासाठी…” गडकरींविरुद्धच्या कथित कटावर संजय राऊतांचे भाष्य

मराठीत गाजलेल्या ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमातील एका दृष्याचा उल्लेख Adv. आशिष शेलार यांनी आपल्या ट्वीटमध्ये केले आहे. स्त्री वेशातील लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे पार्वतीच्या डोहाळे जेवणाची लगबग सुरू असते. ‘न होणाऱ्या’ बाळासाठी खोटी खोटी सजावट… सत्य सगळ्यांना माहिती असतानाही केवळ आपले ‘घर’ टिकवता यावे म्हणून धडपड… नटूनथटून बाकी मित्र नाचत आहेत… ‘कोणी तरी येणार येणार गं.. पाहुणा घरी येणारं गं…’ हे गाणे गात आहेत. शिवसेना उबाठा गटाकडून मुंबईत तथाकथित इंडिया नावाच्या आघाडीच्या स्वागताची जी लगबग सुरू आहे ती पाहताना हे दृष्य पटकन आठवते, असे त्यांनी म्हटले आहे.

काय ती होर्डिंग लावत आहेत, केवढे ते फोटो! कोण कुणाकडे पाहतोय आणि कोण कुणाला हसतोय काही कळत नाही. भाजपासोबत होते तेव्हा भलेमोठे फोटो होर्डिंगवर झळकत होते. आता सोळा केले गोळा आणि स्वतःच स्वतःचा करून घेतला पालापाचोळा, अशी बोचरी टीका आमदार शेलार यांनी केली आहे.

- Advertisment -