विधान परिषदेसाठी चित्रा वाघ, पंकजा मुंडेंना डावलून उमेदवारी दिलेल्या उमा खापरे, श्रीकांत भारतीय आहेत तरी कोण?

तर दुसरीकडे विधान परिषदेच्या स्पर्धेतील मोठ्या नेत्यांना डावलत भाजपने आता श्रीकांत भारतीय यांनी उमेदवारी दिल्याने श्रीकांत भारतीय कोण आहेत असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.

who is uma khapare and shrikant bhartiya bjp give Vidhan Parishad Election 2022 ticket instead of pankaja munde and chitra wagh

राज्यातील १० विधानपरिषदेच्या निवडणुका येत्या २० जून रोजी पार पडणार आहेत. (Vidhan Parishad Election) या निवडणुकीत भाजप पाच जागा लढवणार असून त्या जागांसाठीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली. यात प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना भाजपने विधान परिषदेसाठी संधी दिली आहे. मात्र यात पक्षातील सक्रिय नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि चित्रा वाघ (chitra wagh) यांना डावलण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांच्याऐवजी उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. तर चित्रा वाघ यांच्या जागी श्रीकांत भारतीय यांना संधी दिली आहे. मात्र पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना डावलत नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय नेमके कोण आहेत याची माहिती घेऊ…

कोण आहेत उमा खापरे?

भाजपमधील आक्रमक महिला नेत्या म्हणून उमा खापरे यांच्याकडे पाहिले जाते. भाजपच्या महिला मोर्चाचे अध्यक्षप पद त्यांनी भूषवले, याशिवाय आधी त्यांनी प्रदेश सचिव पदासह विविध पदांचा कार्यभार सांभाळला आहे.
भाजपमधील सर्वात जुन्या नेत्या म्हणून त्यांना ओळखले जाते. तसेच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या समर्थक म्हणूनही ओळखल्या जातात.

उमा खापरे या मुळच्या पिंपरी चिंचवडच्या असून त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेविका म्हणून आपल्या कामाची वेळी छाप निर्माण केली, सलग दोन वेळा त्या नगरसेविका म्हणून निवडूण आल्या. तर २००१-२००२ या कालावधीत त्यांनी पिंपरी चिंचवड पालिकेत विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सांभाळली.

दिपाली सय्यद यांच्यातील वादामुळे चर्चेत

दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावरून दिपीली सय्यद विरुद्ध उमा खापरे असा वाद उफाळून आला होता. यावेळी उमा खापरे यांनी मोदींविरोधात आक्षेपार्ह टीका केल्यास घरात घुसून चोप देऊ असा इशारा दिला होता. त्यामुळे दिपाली सय्यदविरुद्ध उमा खापरे यांच्या वादाची चांगलीच चर्चा रंगली.

तर दुसरीकडे विधान परिषदेच्या स्पर्धेतील मोठ्या नेत्यांना डावलत भाजपने आता श्रीकांत भारतीय यांनी उमेदवारी दिल्याने श्रीकांत भारतीय कोण आहेत असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.

कोण आहेत श्रीकांत भारतीय?

भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारांची यादी बड्या नेत्यांना बाजूला करत यंदा उमा खापरे यांच्यासह श्रीकांत भारतीय या नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. त्यामुळे श्रीकांत भारतीयांबाबत अनेक सवाल उपस्थित होत आहे. श्रीकांत भारतीय हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. भाजपमधील एक अभ्यासू नेता म्हणूनही त्यांना ओळखले जाते. याशिवाय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भारतीय हे फडणवीसांचे ओएसडी होते. भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य असण्याबरोबरचं त्यांनी 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वॉर रुमचे प्रमुख पद सांभाळले, शिवसेनेवर नेहमी टीकास्त्र टागण्यात श्रीकांत भारतीय अव्वल आहेत.

दरम्यान भाजपने विधान परिषदेसाठी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना दुसऱ्यांदा संधी दिली आहे. तर राम शिंदे हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले त्यामुळे त्यांना आता विधान परिषदेवर पाठवण्यात येणार आहे.

भाजपने विधानपरिषदेसाठी जाहीर केलेल्या उमेदवारीवरून त्यांच्या मित्र पक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येतेय. यात शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांना भाजपने उमेदवारी न दिल्याने जाहीर नाराजी व्यक्त केलीय. यावर मेटे यांनी आम्हाला काय फक्त वापरुन घेतलं का? असा सवाल केलाय. याच पार्श्वभूमीवर ते आज संध्याकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहेत.


विधान परिषदेत पंकजा मुंडेना डावललं; आता चंद्रकांत पाटील म्हणतात…