Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सामना कोण वाचतं? आमच्या जिल्ह्यात सामना पेपरच येत नाही - आमदार पडळकर

सामना कोण वाचतं? आमच्या जिल्ह्यात सामना पेपरच येत नाही – आमदार पडळकर

सिंधुदुर्ग दौऱ्यात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामनावर' केली टीका

Related Story

- Advertisement -

कोकण दौऱ्यावर असलेले धनगर समाजाचे नेते, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकावर आज सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना टिका केली. सामना पेपर कोणी वाचत नाही. शिवसेनेच्या बालेकिल्ला असलेल्या कोकणात सामनाच्या किती प्रती येतात असा सवाल केला. आमच्या जिल्ह्यात सामना पेपर येतच नाही आणि आपण सामना पेपर कधीच वाचलाच नाही असा टोला देखील लगावला.

‘आधी पेट्रोलचे भाव कमी करा मग राम मंदिरासाठी निधी जमा करा’ या ‘सामना’त आलेल्या अग्रलेखावर गोपीचंद पडळकर यांनी खरमरीत टीका केली आहे. सामना पेपर कोणी वाचत नाही. तुम्ही लोकं टीव्हीवर सामना दाखवता मग तो लोकांना कळतो. कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, कोकणात सामना किती येतो? असा पडळकरांनी सवाल केला आहे.

मी तर सामना कधीच वाचला नाही…

- Advertisement -

यावेळी बोलताना पडळकर म्हणाले उगाच बाऊ करू नका. आमच्या जिल्ह्यात सामना येतच नाही, मी तर सामना कधीच वाचला नाही. त्यामुळं असल्या विषयात बोलणं बरोबर नाही, असे पडळकर म्हणाले.

धनगर आरक्षणावर आमची भूमिका आजही ज्वलंत

- Advertisement -

गोपीचंद पडळकर यांनी यावेळी धनगर समाज आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले, धनगर समाज आरक्षणावर आमची भूमिका आजही ज्वलंत आहे. कोरोना काळात मोठ्या संख्येने एकत्र येऊन त्यांना काही कोरोनाची बाधा झाली तर त्यांच्याकडे उपचार करण्याइतकी परिस्थिती नाही. मात्र आमची भूमिका आजही ज्वलंत आहे असे ते म्हणाले.

 

- Advertisement -