घरमहाराष्ट्रCovaxin : WHO ने UN साठी रोखला Covaxin लसीचा पुरवठा, कंपनीने दिले...

Covaxin : WHO ने UN साठी रोखला Covaxin लसीचा पुरवठा, कंपनीने दिले स्पष्टीकरण…

Subscribe

जगभरात कोरोनाविरोधातील लढाई अद्यापही सुरूच आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाविरोधी प्रतिबंध करण्यासाठी अजुनही लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामध्येच जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने Covaxin च्या पुरवठ्यावर ब्रेक लावला आहे. डब्ल्यूएचओने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार भारत बायोटेकद्वारे तयार करण्यात येणाऱ्या covid-19 विरोधी कोवॅक्सीन लसीच्या संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून होणारा पुरवठा रोखण्यात आला आहे. पण ही लस प्रभावी असून कोणत्याही चितेंची बाब नसल्याचेही डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे.

कोवॅक्सीनच्या पुरवठ्याबाबतची माहिती देताना डब्ल्यूएचओने स्पष्ट केले की, भारत बायोटेककडून मिळणारी आणि संयुक्त राष्ट्राकडून वितरीत करण्यात येणारी कोवॅक्सीन लसीचा पुरवठा आता थांबवण्यात आला आहे. लस निर्मिती करणाऱ्या कंपनीला सुविधा अपग्रेड करण्यासाठी तसेच निरीक्षणात आढळलेल्या काही त्रुटी दूर करण्यासाठी हा पुरवठा रोखण्यात आल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने लस मिळवणाऱ्या कंपन्यांना योग्य कारवाईचे संकेत दिले आहेत. पण हे कोणत्या प्रकारच्या कारवाईचे संकेत आहेत, याबाबत मात्र कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केल्यानुसार कोवॅक्सीन लस अतिशय प्रभावी आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने लसीच्या बाबतीत कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. पण डब्ल्यूएचओच्या भूमिकेमुळे कोवॅक्सीनच्या एकुणच पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

- Advertisement -

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हैद्राबादस्थित भारत बायोटेक कंपनीच्या खुलाशानुसार कोवॅक्सिनच्या प्रभावीपणा आणि सुरक्षेबाबत कोणताही प्रभाव पडलेला नाही. कोवॅक्सीन लस दिलेल्या लोकांसाठी देण्यात आलेली प्रमाणपत्रे आजही मान्यताप्राप्त आहेत. त्यामुळे कंपनी आगामी काळात अधिकाधिक सुविधा देण्याच्या दृष्टीने लक्ष केंद्रीत करेल असेही कोवॅक्सीनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -