घरमहाराष्ट्रपुढील पंतप्रधान कोण होणार हे घोषित करा

पुढील पंतप्रधान कोण होणार हे घोषित करा

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असा डॉयलॉग मारणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढील पंतप्रधान कोण होणार? हे आता घोषित करावे, असे आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असा डॉयलॉग मारणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढील पंतप्रधान कोण होणार? हे आता घोषित करावे, असे आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. भाजप प्रदेश कार्यालयात बोलताना तावडे म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण खुप हुशार आहेत, ते विदेशात शिकून आले आहेत. नरेंद्र मोदी जर पंतप्रधान होणार नाहीत, हा तुमचा राजकीय अभ्यास असेल तर मग कोण पंतप्रधान होणार हे त्यांनी जाहीर करावे, असेही तावडे यांनी सांगितले.

काय म्हणालेत तावडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वर्धा येथील जाहीर सभेत शरद पवार यांच्यावर टिका करत त्यांच्या मर्मावरच घाव घातला आहे. पंतप्रधान मोदी यांची टिका बहुधा सुप्रिया सुळे यांना रुचली नाही, त्यामुळेच त्यांनी मोदीजी यांना कुटुंबाचा अनुभव नाही असे वक्तव्य केले. पण नरेंद्र मोदी यांना एक भाऊ आहे. त्यांच्या भावाला मुले आहेत. त्यांच्या भावाशी आणि त्यांच्या मुलांशी कुटुंबातील वागणूक कशी आहे, हे दिसत आहे. पण पवारांच्या कुटुंबातील वास्तव नरेंद्र मोदी यांनी समोर आणल्यानंतर ते स्विकारण्या पेक्षा विनाकारण चिडचिड करु नये असा टोलाही तावडे यांनी सुप्रिया सुळे यांना मारला.

- Advertisement -

काँग्रेसचा जाहीरनामा

काँग्रेसने आज प्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्याविषयी बोलताना, तावडे म्हणाले की, ‘गरीबीवर वार….. मिळणार ७२ हजार’ ही घोषणा म्हणजे काँग्रेसला ‘गरीबांवर वार वडेरा मालदार’ अशी बहुधा करायची आहे. तसेच हम निभायेंगे या काँग्रेस जाहीरनाम्याच्या घोष वाक्यावर बोलताना तावडे म्हणाले की, हम निभायेंगेच्या हम मध्ये कोण आहेत, ममता आहेत, मायावती आहेत. अखिलेश आहे, आंध्रचे चंद्रबाबू आहेत, केरळचे नेते आहेत, तामिळनाडूचे नेते आहेत जे काही २५ जण रांगेत उभे आहेत, त्या हम मधला नेमका कोण आहे, हे स्पष्ट करावे नाहीतर हम आपके है कौन असे म्हणावे लागेल. त्यामुळे काँग्रेसच्या जाहिरनाम्यातील हम निभायेंगे या घोष वाक्यातील हम म्हणजे नेमके कोण हे काँग्रेसने सांगण्याची गरज आहे आणि जर काँग्रेसने हे सांगितले तरच या जाहिरनाम्याला अर्थ राहील.

अखेर उमेदवार सापडला

काँग्रेसला अखेर पुण्यामध्ये उमेदवार मिळाला, त्याबद्दल काँग्रेसचे अभिनंदन करताना तावडे म्हणाले की, मोहन जोशीं सारख्या काँग्रेस कार्यकर्त्यालाच तिकीट द्यायचे होत तर इतके दिवस काँग्रेस राष्ट्रवादीच्या दबावाखाली प्रविण गायकवाडांचा प्रवेश करुन का थांबली होती, याचे उत्तर काँग्रेसने दिले पाहिजे. पण शेवटी काँग्रेसला उमेदवार मिळाला, ही लोकशाहीसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -