Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रLegislative Council seat vacant : निवडणूक जिंकली, आता विधान परिषदेच्या 6 जागांवर...

Legislative Council seat vacant : निवडणूक जिंकली, आता विधान परिषदेच्या 6 जागांवर कोणाला संधी?

Subscribe

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत करत महायुतीने पुन्हा सत्ता काबिज केली आहे. मात्र आता निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या काही जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या जागांवर विधानसभा निवडणुकीत संधी न मिळालेल्या नाराज नेत्यांना संधी मिळणार का? हे पाहावे लागेल.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत करत महायुतीने पुन्हा सत्ता काबिज केली आहे. मात्र आता निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या काही जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या जागांवर विधानसभा निवडणुकीत संधी न मिळालेल्या नाराज नेत्यांना संधी मिळणार का? हे पाहावे लागेल. (Who will get a chance from the Mahayuti to fill the 6 vacant seats in the Legislative Council ?)

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीने विधानसभा निवडणुकीत दमदार पुनरागमन केले. विधानसभा निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता होती. मात्र निवडणुकीआधी महायुतीने आणलेल्या योजनांमुळे जनतेचा कौल त्यांच्या बाजूने फिरला. विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी 145 चा आकडा गाठणे आवश्यक असते. मात्र महायुतीने 236 पर्यंत मजल मारली. यात भाजपाने तब्बल 132 जागांवर विजय मिळवला आहे. शिंदे गटाला 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. या निवडणुकीत महायुतीने विधान परिषदेवर असलेल्या आमदारांना तिकीट दिले होते. त्यामुळे आता जिंकलेल्या आमदारांमुळे विधान परिषदेच्या 6 जागा रिक्त झाल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Legislative Council seat vacant : निवडणूक जिंकली, आता विधान परिषदेच्या 6 जागांवर कोणाला संधी?

विधान परिषदेतील भाजपाच्या 4 आमदारांची विधानसभेवर वर्णी लागली आहे. सध्या विधानपरिषदेवर आमदार असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रवीण दटके हे भाजपाचे चार नेते विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेत भाजपाच्या ४ जागा रिक्त झाल्या आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून आमश्या पाडवी आणि अजित पवार गटाकडून राजेश विटेकर हे विजयी झाले आहेत. त्यामुळे शिंदे आणि अजित पवार गटाकडूनही प्रत्येकी एक-एक जागा रिक्त झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत डावलण्यात आलेल्या नेत्यांना विधान परिषदेवर संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे महायुतीकडून कोणाला संधी मिळणार? हे पाहावे लागेल.

- Advertisement -

मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत

दरम्यान, महायुती 2.0 मध्ये मुख्यमंत्री कोण होणार? याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचे सागर हे शासकीय निवासस्थान भाजपाच्या घडामोडींचे केंद्र बनले आहे. भाजपा नेत्यांच्या तिथे बैठका सुरू आहेत. राज्यातील भाजपाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा आग्रह धरला जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही फडणवीस यांच्याच नावाला पसंती असल्याचे बोलले जात आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा केंद्रीय नेत्यांसोबतच्या बैठकीतच होणार, असे सांगितले जात आहे. यानंतर तिन्ही पक्षांच्या एकत्रित बैठकीत हा निर्णय होईल? त्यामुळे मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : मविआ की महायुती, छोटे पक्ष-अपक्षांची साथ कोणाला?


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -