घाबरलेला भोंगा पूर्ण महाराष्ट्राने बघितला, दीपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका

तुम्ही ते प्रेम पत्रक घराघरात पाठवणार आहात, त्या पत्रकामधून घराघरातील मुलांना तुम्ही काय शिकवण देताय, तुम्ही त्यांच्या डोक्यात काय टाकताय. तुम्ही त्यांना शिक्षा देताय, शिक्षण देताय, तुम्ही त्यांना रोजगार देताय. जर तुम्ही घाबरून दौरा कॅन्सल करत आहात तर तुम्ही आदित्य ठाकरेंचा हात पकडा, म्हणजे तुमचा दौरा कम्प्लिट होईल, असंही दिपाली सय्यद यांनी अधोरेखित केलंय.

मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील गणेश कला क्रीडामध्ये सभा घेत अयोध्या दौरा का रद्द केला याचं कारण सांगितलं. आता त्याच मुद्द्यावरून शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.
शिवसेनेनं झोप उडवली म्हणून राज ठाकरेंनी आज सकाळी सकाळीच सभा घेतली. घाबरलेला भोंगा पूर्ण महाराष्ट्राने बघितला आहे, असं म्हणत राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. दिपाली सय्यद यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत राज ठाकरेंवर तोफ डागली आहे.

पत्रक पाठवून, आंदोलन करून केसेस घेणारे अमित ठाकरेंना कुठे लपवून ठेवणार आहेत. केसेसेला घाबरून तुम्ही दौरा कॅन्सल करणारे स्वतःला हिंदू जननायक स्वयंघोषित म्हणू शकत नाही हे सगळ्या महाराष्ट्राला कळलेलं आहे. तुम्ही ते प्रेम पत्रक घराघरात पाठवणार आहात, त्या पत्रकामधून घराघरातील मुलांना तुम्ही काय शिकवण देताय, तुम्ही त्यांच्या डोक्यात काय टाकताय. तुम्ही त्यांना शिक्षा देताय, शिक्षण देताय, तुम्ही त्यांना रोजगार देताय. जर तुम्ही घाबरून दौरा कॅन्सल करत आहात तर तुम्ही आदित्य ठाकरेंचा हात पकडा, म्हणजे तुमचा दौरा कम्प्लिट होईल, असंही दिपाली सय्यद यांनी अधोरेखित केलंय.

…म्हणून अयोध्या दौरा रद्द केला

तत्पूर्वी अयोध्या दौरा रद्द करण्याचंही राज ठाकरेंनी कारण सांगितलं. अयोध्येला येऊ देणार नसल्याचं सांगितलं गेलं, विरोध केला. मला मुंबईतून, दिल्लीतून माहिती मिळत होती. मला उत्तर प्रदेशातूनही काही लोक सांगत होते. मला असं लक्षात आलं की हा सापळा आहे. आपण या सापळ्यात अडकलं नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टींची रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली. हा पुन्हा विषय बाहेर काढा, असं सांगितलं गेलं. सगळ्यांनी सगळ्या गोष्टी मिळून आराखडा आखला गेला. मी अयोध्येला जाणार जो विचार माझ्या मनात होता. रामजन्मभूमीचं दर्शन घेणं हा विषय आला, पण त्यावेळी आताचे अनेक जण जन्मालाही आलेले नसतील. ज्यावेळी कारसेवक अयोध्येला गेले होते, त्यावेळी सर्व कारसेवक ठार मारलं होतं, आणि सर्व कारसेवकांना प्रेतं शरयू नदीत तरंगत होती. जिथे माझे कारसेवक गेलेत, त्याचंही दर्शन घडलं असतं, असंही त्यांनी सांगितलं.


हेही वाचाः …म्हणून अयोध्या दौरा रद्द केला, राज ठाकरेंनी सांगितलं ‘कारण’