घरमहाराष्ट्रमाझा दिवस खराब का करतोस? उद्धव ठाकरेंचं नाव ऐकताच नारायण राणे संतापले

माझा दिवस खराब का करतोस? उद्धव ठाकरेंचं नाव ऐकताच नारायण राणे संतापले

Subscribe

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील पहिली बायपास सर्जरी SSPM मध्ये पार पडल्यानंतर माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी एका माध्यम प्रतिनिधीने प्रश्न विचारला. मात्र उद्धव ठाकरेंचं नाव ऐकताच, त्यांचा एकेरी उल्लेख करत “माझा दिवस खराब का करतोस? असा संताप नारायण राणे यांनी व्यक्त केला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका होतील असं भाकित केलं आहे. यावरून नारायण राणे यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख त्यांनी मध्यावधी निवडणुका होणार असल्याचं वृत्त फेटाळलं.

- Advertisement -

हेही वाचा – सिंधुदुर्गवासींयांना कोणत्याही उपचारांसाठी मुंबई -पुण्याला जाण्याची गरज नाही; नारायण राणेंचे आश्वासन

नारायण राणे म्हणाले की, मध्यवर्ती निवडणुका कशा होणार? असं भाकित करणारा हा कोण? भविष्यवाणी सांगतो का हा? कोण आहे तो? संपला ना तो! मुख्यमंत्री असताना मातोश्रीच्या बाहेर कधी पडला नाही, विकासाच्याबाबतीत राज्याला 10 वर्ष मागे नेले, आणि आता घरबसल्या मध्यवधी  निवडणुका होणार असं बोल्लाय काय? का होणार मध्यवधी निवडणुका? तुम्ही तरी सांगा, मध्यवधी निवडणुका व्हायला काय युद्ध झालंय? नैसर्गिक आपत्ती आलीय? काही कारण असायला हव ना! त्यांनी कारण सांगवं का मध्यवधी निवडणुका होणार? त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून मध्यवधी निवडणुका होणार का? नाही तसं होत नसतं. मला नाही वाटत हे अभ्यासपूर्ण केलेलं वक्तव्य असावं. घरात बसून बोलायला काय? जरा बाहेर येऊन बोला म्हणावं. मैदानात येणार आधी मातोश्रीच्या बाहेर येऊन बोलत नाही ते मैदानात काय येणार?अशा अनेक प्रश्नांचा भडिमार करत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टिका केली आहे.

माझा दिवस खराब का करतोस? उद्धव ठाकरेंचं नाव ऐकताच नारायण राणे संतापले
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -