देशापेक्षाही जळगावचा मृत्यूदर ४ पट जास्त; मृत्यूदर पाहून तुम्हालाही बसेल धक्का

देशापेक्षाही जळगावचा मृत्यूदर ४ पट जास्त असल्याचे समोर आले आहे.

Why Covid death rate in Maharashtra’s Jalgaon is four times India’s
मृत्यू

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस कोरोना विषाणूने अक्षरश: देशात कहर केला आहे. तर कोरोनामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि पुणे या शहरात सर्वात अधिक कोरोना रुग्णांची संख्या आहे, त्यामुळे ही शहरे सध्या चर्चेत आहेत. मात्र, या दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जळगाव या जिल्ह्याने मुंबई, पुणे आणि देशाला देखील मृत्यूदरात मागे टाकले आहे. कोरोनानुळे देशात होणाऱ्या मृत्यूदरापेक्षा जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर चारपट अधिक आहे. मागील ३० दिवसांच्या कालावधीत तब्बल ११२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशाचा मृत्यूदर २.८ टक्के

देशात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. मात्र, जळगाव जिल्ह्याने मुंबई, पुणे आणि देशाला देखील मृत्यूदरात मागे टाकले आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अर्थात मृत्यूदर २.८ टक्के इतका आहे. तर जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर १२. ३ टक्के आहे. त्यामुळे जळगावने सर्वांचीच झोप उडवली आहे. मुंबईपासून ४०० किमी अंतरावर असलेल्या जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, अमळनेर आणि पाचोरा या चार शहरात ४ जून पर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला आहे.

४२ कोरोनाबाधितांपैकी १४ जणांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ४२ होता. त्यावेळी यातील १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. केवळ पाच दिवसात १४ जणांचा कोरोना विषाणूने बळी घेतला होता. त्यानंतर पुढील ३० दिवसांच्या कालावधीत जळगाव जिल्ह्यात १०० पेक्षा अधिक जणांचा संसर्ग होऊन मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यामध्ये ६० जणांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक होते. तर ४७ जणांचे वय हे ५० ते ६० या वयोटातील होते. तर ५ जण ते ४० ते ५० वयोगटातील होते. या मृत्यूमुळे जिल्ह्याचा मृत्यूदर एका महिन्याच्या काळात देशातील मृत्यूदरापेक्षा चारपट अधिक झाला आहे. राज्य सरकारने आता प्रत्येक व्यक्तीच्या कारणांची चौकशी करण्यासाठी १० सदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे.

ही आहेत मृत्यूची कारणे

जळगावमध्ये कोरोनाने होणाऱ्या मृत्यूचे एकच कारण नसल्याचे इंडियन एक्स्प्रेसने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष, कर्मचारी आणि डॉक्टरांच्या समुपदेशनाचा अभाव, चाचण्या करण्यास होत असलेला विलंब, रुग्णांवर लक्ष ठेवण्याकडे होत असलेले दुर्लक्ष आणि विलगीकरण कक्षात सर्वसामान्य नागरिकांना सहज मिळणारा प्रवेश, यासारख्या कारणांमुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे.


हेही वाचा – पेण : रेल्वे रुळावर बसलेल्या तिघांना मालगाडीने चिरडले; तरुणांचा जागीच मृत्यू