घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'देवेंद्र फडणवीसांना आता हे का सुचले?'; उपमुख्यमंत्र्यांच्या आरोपानंतर नाना पटोलेंचा सवाल

‘देवेंद्र फडणवीसांना आता हे का सुचले?’; उपमुख्यमंत्र्यांच्या आरोपानंतर नाना पटोलेंचा सवाल

Subscribe

नाशिक : आमचे मित्र देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री आहेत. एवढया कालावधीनंतर आज फडणवीसांना हे का सुचले हा जनतेच्या प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न आहे असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. ठाकरे सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचा डाव होता असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत केला यावर पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार प्रचारार्थ आयोजीत सभेप्रसंगी ते नाशिकमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस यांना हे आताच का सुचले? आज ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत म्हणून? हा निव्वळ जनतेचे मूळ मुद्दे भरकटविण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे.राज्यात १०५ आमदार निवडून आले. खासदार दिले. मी संपूर्ण मुलाखत बघत होतो. यात फडणवीस जनतेच्या प्रश्नावर काहीच का बोलले नाही. ७५ हजार रोजगार निर्माण करू हे गाजर २०१९ मध्ये दाखवण्यात आले. आता सत्तेत आले तेव्हाही दाखवण्यात येतेय. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर का बोलत नाही. त्यांची मुलाखत ऐकतांना असे वाटत होते की, ते बेरोजगारी, महागाई याबाबत बोलतील पण तसे काही झाले नाही ते स्वतः बददलच बोलत होते. सत्ताधीशांनी स्वतःपेक्षा जनतेची काळजी करावी अशी आमची अपेक्षा आहे. राजभवनात मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहेत त्याचे पुरावे आम्ही दिले. राज्यपालांकडून महापुषांचा अवमान केला जातो त्यावर फडणवीस बोलतील असे वाटत होते. जनतेच्या मुळ प्रश्नांना बगल देण्याचा फडणवीस यांचा हा प्रयत्न दिसून आला असे ते म्हणाले.

- Advertisement -
महाराष्ट्राला लुटणे हाच भाजपचा अजेंडा

महाराष्ट्रातील वन्य प्राणी गुजराला नेण्यात आले याबाबत बोलतांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले. महाराष्ट्राला लुटा अन गुजरातला द्या हीच यांची निती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधातील सरकार या राज्यात आणि देशात काम करतयं असा आरोपही त्यांनी यावेळी केला. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या महाराष्ट्रात आहोत.छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला लुटायचे अन पुण्याला वाटायचे अशी म्हण जुन्या काळात होती. एकिकडे शिवाजी महाराजांच्या नावाने सत्तेत यायचे अन शिवाजी महाराजांच्या विरोधातच काम करायचे, महाराष्ट्राला लुटायचे आणि सुरतेला वाटायचे अशा पध्दतीचे कृत्य सुरू आहे. उद्योग, घरकुले गुजरातला देण्यात आले. आता वन्य प्राणी गुजरातला हलविण्यात येत आहेत. खर्‍या अर्थाने शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधातले सरकार महाराष्ट्रात आहे असे आता मानायला काही हरकत नाही अशी टिका त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -