घरमहाराष्ट्रजितेंद्र आव्हाडांच्या 'त्या' कृत्याबद्दल सुप्रिया सुळे गप्प का, रिदा रशीद यांचा सवाल

जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ कृत्याबद्दल सुप्रिया सुळे गप्प का, रिदा रशीद यांचा सवाल

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी ठाण्यातील एका फ्लायओव्हरच्या उद्घाटनावेळी आपल्याशी केलेल्या गैरवर्तनाबाबत महिलांच्या सन्मानाची भाषा करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे तसेच महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपली चाकणकर या गप्प का, असा सवाल भाजपा महिला मोर्चा प्रदेश महामंत्री रिदा रशीद यांनी केला.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. रशीद म्हणाल्या की, ठाण्यात रविवारी झालेल्या फ्लायओव्हरच्या उद्घाटन कार्यक्रमाला आमंत्रण असल्यामुळे मी तेथे गेले होते. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मी बाजूला थांबले होते. मुख्यमंत्री वाहनातून निघाले असताना मी त्यांना भेटण्यासाठी जात असताना समोरून येणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी मला सरळ-सरळ बाजूच्या पुरुषांच्या गर्दीत ढकलून दिले. ‘तू इथे काय करते आहेस,’ असे ते म्हणाले. या घटनेबाबत आपण पोलिसांकडे तक्रार केली असून आव्हाड यांनी मला कशा पद्धतीने ढकलले, हे या व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे, असे ते म्हणाले.

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि रुपाली चाकणकर यांनी आपल्या पक्षाच्या आमदाराच्या या कृत्याबाबत अजूनही चकार शब्द उच्चारलेला नाही. माझ्या तक्रारीबाबत पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई करावी, एवढेच माझे म्हणणे आहे, असेही रशीद यांनी नमूद केले.

असे आरोप वेदनादायक – सुप्रिया सुळे
एखादी महिला जेव्हा कोणावर आरोप करत तेव्हा तिची बाजू पूर्णपणे ऐकून घेतलीच पाहिजे. त्यामुळे तो व्हिडीओ तीन चार वेळा पाहिला. दुर्दैव या गोष्टीचे आहे की, राजकारणाची पातळी इतकी खालावली आहे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी तिथे आहेत, त्यात मुख्यमंत्री स्वत; तिथे आहेत. खासदार श्रीकांत शिंदे आहेत, पोलिसांची यंत्रणा कार्यकर्ते, सहकारी दिसत आहेत. अशावेळी असे आरोप होणे वेदना देणारे आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या नेत्यांची विनंती आहे की, जितेंद्र आव्हाड यांनी लढले पाहिजे. वाईट वाटून घेता कामा नये, ही लढाई खोट्यानाट्या केसेस विरोधातील आहे. त्यामुळे आपल्याला लढवेच लागणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -