घरमहाराष्ट्रविद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे? रामदास आठवलेंच्या शैलीत आशिष शेलारांची ठाकरेंवर...

विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे? रामदास आठवलेंच्या शैलीत आशिष शेलारांची ठाकरेंवर टीका

Subscribe

ज्यांना मुंबईतील रस्त्यांवरील बुजवता येत नाही खड्डे, त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे! अशा शब्दांत आशीष शेलारांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुंबई – राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरू निवडीचे अधिकार राज्यापालांना देण्यात आले आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ठाकरे सरकारने कुलगुरू निवडीचे राज्यपालांकडे असलेले अधिकार काढून टाकले होते. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने आता पुन्हा ठाकरेंना धक्का देत त्यांचा निर्णय बदलला आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनीही टीका केली आहे. ज्यांना मुंबईतील रस्त्यांवरील बुजवता येत नाही खड्डे, त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे! अशा शब्दांत आशिष शेलारांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – शिवसेनेला संपविण्याचा राष्ट्रवादीचा घाट; भाजप नेते आशीष शेलार यांचा आरोप

- Advertisement -

विद्यापीठांचे कुलपती म्हणून राज्यपालांना असलेले अधिकार काढून ते शिक्षण मंत्र्यांना देण्याच्या राजकीय निर्णयाला समाजातील प्रत्येक स्तरातून प्रचंड विरोध असतानाही ठाकरे सरकारने अट्टाहासाने ते विधेयक मंजूर केले होते. आम्ही त्याला सभागृहात आणि बाहेरही कडाडून विरोध केला होता, असं ट्विट आशिष शेलारांनी केलं आहे.

तसंच, शिंदे-फडणवीस सरकारने हे विधेयक मागे घेऊन विद्यापीठांचे संभाव्य राजकीयकरण थांबवले! विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान रोखले, पेग्विन सेनेला चपराक! सरकारचे आभार! असंही आशीष शेलार म्हणाले.

- Advertisement -

तसंच, ठाकरेंवर निशाणा साधताना आशीष शेलारांनी रामदास आठवले स्टाईलमध्ये कविताही केली आहे.

ज्यांना मुंबईतील रस्त्यांवरील बुजवता येत नाही खड्डे
त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे!

रामदास आठवलेंच्या शैलीत आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.


महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील विद्यापीठांमध्ये कुलगुरू निवडीच्या राज्यपालांना असलेल्या अधिकारांत बदल करण्यात आला होता. याबाबत ठाकरे सरकारने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमात सुधारणा केली होती. प्रकुलपती निवडीबरोबरच इतरही निर्णयांची घोषणा करून राज्यपालांना शह देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ठाकरे सरकारच्या या निर्णयाला तेव्हा भाजपकडून कडाडून विरोध करण्यात आला. अखेर मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे फडणवीस सरकारने हा निर्णय मागे घेतला, त्यामुळे ठाकरेंसाठी हा पुन्हा मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा – फडणवीस जिथे उभे राहतात ‘लाइन वही सें शुरू होती हैं’ सांगत आशीष शेलार म्हणाले…

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -