घरमहाराष्ट्रशरद पवारांनी आम्हाला विश्वासात का घेतलं नाही? जितेंद्र आव्हाडांचा प्रश्न

शरद पवारांनी आम्हाला विश्वासात का घेतलं नाही? जितेंद्र आव्हाडांचा प्रश्न

Subscribe

त्यांनी आम्हाला विश्वासात का घेतले नाही?, आमचे असणे त्यांच्यासाठी काहीच नाही का? आणि या लढाईत आम्ही शरद पवार यांच्याशिवाय कसे लढणार? असे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांनी काल मंगळवारी (ता. 5 मे) ‘माझे सांगाती… राजकीय आत्मकथा’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. पण यावेळी शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर कार्यक्रमस्थळी कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांनी एकच गोंधळ घालत पवार यांना निर्णय मागे घेण्याची मागणी केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant patil), पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) आणि उपस्थित असलेल्या अनेकांना अश्रू अनावर झाले.

हेही वाचा – ठाकरे कुटुंबाला फुकटचं खायच आणि फिरायच माहिती, नितेश राणेंनी सांगितला किस्सा

- Advertisement -

पण शरद पवार यांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरूवात केली आहे. परंतु हे राजीनामे मंजुर करण्यात येणार नसल्याचे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले आहे. पण आज (ता. 03 मे) पक्षाचे नेते आणि मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा पदाधिकाऱ्यांसह राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर त्यांना प्रसार माध्यमांशी संवाद साधत शरद पवार यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले.

आम्हाला विश्वासात का घेतले नाही?…
शरद पवार यांना त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागेल. लोकशाहीमध्ये लोक सांगतील त्याप्रमाणे नेत्यांनी चालले पाहिजे. नेत्यांना जरी लोकांनी घेतलेला निर्णय पटत नसला तरी त्यांनी तो निर्णय मान्य केला पाहिजे, असे तेच बोलले आहेत. मग शरद पवार स्वतः असे कसे काय करू शकतात?, त्यांनी आम्हाला विश्वासात का घेतले नाही?, आमचे असणे त्यांच्यासाठी काहीच नाही का? आणि या लढाईत आम्ही शरद पवार यांच्याशिवाय कसे लढणार? असे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

मी लोक मोजून राजकारण करत नाही…
जितेंद्र आव्हाड यांनी त्यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत बोलताना म्हंटले की, मा एकटा आहे. मी लोक मोजून राजकारण करत नाही. 35 वर्षांपासून राजकारणात आहे, पण हे कधीच नाही मोजले की माझ्यामागे किती लोक आहेत. त्यामुळे आजपर्यंत मी जी कोणती भूमिका घेतली आहे ती लोकांनी मान्य केली आणि नंतर पक्षाने देखील ती भूमिका मान्य केल्याचे यावेळी जितेंद्र आव्हाडांकडून सांगण्यात आले.

पवारांनी नेहमीच नवीन लोकांना संधी दिली…
एकीकडे शरद पवार यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मनधरणी करण्यात येत असतानाच अजित पवार (Ajit pawar) यांनी मात्र त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. नवीन अध्यक्ष पवारसाहेबांच्या नेतृत्वात तयार झाल्यास काय अडचण आहे? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला होता. पण शरद पवार नेहमीच नवीन लोकांना संधी देत असतात. पक्षामध्ये अनेक पद आहेत. त्या पदांवर सगळ्या नवीन लोकांना घ्या. आम्ही पण राजीनामा दिला आहे. पण ते गेले नाही पाहिजे, असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -