घरमहाराष्ट्रकोरोना रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज का लागते? ऑक्सिजन पुरवठा का पडतोय कमी?

कोरोना रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज का लागते? ऑक्सिजन पुरवठा का पडतोय कमी?

Subscribe

राज्य सरकार कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचं मॉडेल राज्यभर राबवण्याच्या तयारीत आहे.

जगभरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मात्र या कोरोना रुग्णांना ऑक्सिजन प्राणवायू उपचारासाठी कुठेतरी महत्त्वपूर्ण भूमिका निभावात आहे. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याची किंवा ऑक्सिजन सिलेंडरची कमरता जाणवत आहेत. अनेक रुग्णांना कोरोना उपचारांसाठी ऑक्सिजन बेड्सची आवश्यकता असतानाही रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून ते उपलब्ध करुन देण्यात अडचणी येत आहे, परिणामी अनेक रुग्णांची कोरोना उपचारांदरम्यान ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्यात. त्यामुळे विरोधकांकडूनही यावर आरोप प्रत्योरोप सुरु झाले आहेत. दरम्यान ऑक्सिजन बेड्सच्या कमरतेमुळे अनेक रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात वणवण भटकावे लागत आहे. पण अनेकदा असा प्रश्न पडतो कोरोना रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजनची एवढी का गरज लागते?

रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजनची गरज का लागते?

कोविड १९ विषाणु घशावाटे थेट रुग्णाच्या फुफ्फुसावर हल्ला करतो. त्यामुळे अनेक रुग्णांना श्वसनाच्या विकारांना सामोरे जावे लागते. फुफ्फुसाच्या शेवटच्या भागाला अल्वेओलाय ( वायुकोश ) असे म्हटले जाते. या भागाद्वारे रुग्ण नैसर्गिक दृष्ट्या बाहेरच्या वातावरणातील ऑक्सिजन घेतो आणि तो शरीरातील रक्ताला पुरवठा करतो. जर याच भागाला इजा झाली तर रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो त्यामुळे रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासते. कोरोना विषाणुही रुग्णाच्या अल्वेओलाय या भागावर परिणाम करतो. अल्वेओलायला इजा झाली तर रुग्णाच्या शरीराला ऑक्सिजनची कमतरता भासते आणि मग रुग्णाला धाप लागतात. जीव घाबराघुबरा होते. श्वास घेण्यास अनेक अडचणी येतात. अशावेळीच कृत्रिम ऑक्सिजन न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे जोवर रुग्णाला नैसर्गिक दृष्ट्या ऑक्सिजन घेता येत नाही तोपर्यंत त्याला कृत्रिम ऑक्सिजन दिले जाते.

- Advertisement -

दरम्यान कोरोना रुग्णाला ४ ते ५ दिवस ऑक्सिजन दिल्याने तो पूर्वपदावर किंवा कोरोनातून काही प्रमाणात बाहेर येऊ शकतो. परंतु रुग्णाला किती प्रमाणात ऑक्सिजन द्यायचे व ते किती वेळ द्याचे याचे मापदंड डॉक्टर ठरवतात. त्यामुळे रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी एस पी ओ २ या चाचणीद्वारे मोजून डॉक्टर कृत्रिम ऑक्सिजन पुरवतात. रुग्ण अतिगंभीर अवस्थेत असल्यास त्या अतिदक्षता विभागात हलवले जाते. काही कोरोना बाधिक रुग्णांना आधीच फुफ्फुसाचे आजार असल्याने त्यांना ऑक्सिजन लागण्याची शक्यता अधिक असते. विशेष म्हणजे या रुग्णाला वेळेत योग्य उपचार मिळाले तर तो रुग्ण कोरोनातून बरा होऊ शकतो.

ऑक्सिजन पुरवठा कमी का पडतोय?

राज्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे अनेक जिल्हात ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत असल्याच्या घटना समोर येत आहेत. राज्य शासनाने साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करीत ऑक्सिजन उत्पादकांना वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० % व उद्योगांसाठी २० टक्के या प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करण्याचे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र ऑक्सिजनची वाढती गरज पाहता आता ऑक्सिजन उत्पादकांना वैद्यकीय क्षेत्रासाठी १०० % ऑक्सिजन पुरवठा बंधनकारक करण्यात आले आहे. रुग्णालयांसह फेब्रिकेशन इंडस्ट्रीज आणि धातू कापण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडरचा वापर सर्वाधिक होतो. त्यामुळे आता कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी ऑक्सिजनची गरज असताना तेथे ऑक्सिजन जास्त वापरला जात आहे. परंतु अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन सिंलेडरची उपलब्धता कमी प्रमाणात आहे. तसेच काही राज्यांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर ऱिफिलिंग, वाहतूक अडचणी तसेच सरकारची मान्यता न ऑक्सिजन उत्पादनात येत असणाऱ्या अडचणी वाहता ऑक्सिजन पुरवठा वेळेवर होणे अशक्य होत आहे. यावर राज्य सरकारकडूनही पाऊले उचलली जात आहेत मात्र वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणताना आणि प्रत्येक रुग्णाला ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करुन देताना रुग्णालय प्रशासनाचीही दमछाक होत आहे.

- Advertisement -

याचपार्श्वभूमीवर आता राज्य सरकार कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये (Gadhinglaj oxygen plant) उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचं मॉडेल राज्यभर राबवण्याच्या तयारीत आहे. कोल्हापुरातील हा ऑक्सिजन प्लांट आता राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. कारण, याच प्लांटच्या धर्तीवर राज्यभर ऑक्सिजन निर्मिती प्लांट सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करतंय. टास्क फोर्सच्या झालेल्या बैठकीतही याच प्लांटबद्दल चर्चा झाली आणि राज्यभर असे प्लांट सुरु करता येतील का याबाबत चाचपणी सुरु असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.150 बेडेड हॉस्पिटल आरामशीर चालतं. 300 जम्बो सिलेंडर दररोज भरु शकतात. किंमत जरा जास्त आहे. 80-85 लाखांच्या आसपास आहे. 15 दिवस इन्स्टॉलेशन लागेल, त्यावर मुख्यमंत्र्यांनी जरुर असा प्रयत्न करु असं सांगितलं” अशी माहिती राजेश टोपे यांनी टास्क फोर्सच्या बैठकीनंतर माध्यमांना दिली.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -