घरमहाराष्ट्रVijay Wadettiwar : एकत्र राहणाऱ्या समाजाला आज एकमेकांचे वैरी का करताय? वडेट्टीवारांचा...

Vijay Wadettiwar : एकत्र राहणाऱ्या समाजाला आज एकमेकांचे वैरी का करताय? वडेट्टीवारांचा सवाल

Subscribe

मुंबई : राज्य सरकारने अधिसूचना काढत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आता ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण ओबीसीविरुद्ध मराठा या भोवतीच आता फिरताना दिसत आहे. अशातच आता विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एकत्र राहणाऱ्या समाजाला आज एकमेकांचा वैरी का करताय तुम्ही? असा सवाल उपस्थित केला आहे. (Why do the communities living together are hostile to each other today Vijay Wadettivar question)

हेही वाचा – Vijay Wadettiwar : “आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी ‘या’ तारखेला विराट सभा घेणार, कोणीही अंगावर येण्याचा विषय नाही”

- Advertisement -

विजय वडेट्टीवार म्हणाले की, मंत्रिमंडळामध्ये ओबीसी चेहरे आहेत, मात्र अनेकजणं शेपूट घालून सत्तेची खुर्ची उगवत आहेत. शेपूट घालून मुद्दाम शब्द वापरतो. कारण त्यांच्यासाठी सत्ता महत्वाची आहे. त्यांना ओबीसी आणि आपल्या समाज बांधवाचं हित महत्वाचं वाटत नाही. म्हणून त्यांनी शेपूट घातलं आहे. आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु त्यांना सत्ता आणि संघर्ष करायचा आहे. त्यामुळे ओबीसी म्हणून स्वतःच्या संरक्षणासाठी जो लढेल त्याच्या पाठीशी समाज नक्कीच उभा राहील, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

मराठा समाजाच्या आरक्षणाला अजिबात विरोध केलेला नाही. सरकारने आपली भूमिका मांडली आहे. परंतु सरकारने वारंवार ओबीसीच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम केलं आहे. ओबीसीच्या कोट्यातून देणार नाही, ओबीसीच्या वाट्यातून देणार नाही ओबीसीला धक्का लागू देणार नाही, असे सरकार म्हणत असले तरी सरकारने आम्हाला कुठेतरी फेकून दिले आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Budget 2024 : शेतकऱ्यांना मिळणार 6 हजार ऐवजी ‘एवढी’ रक्कम; किसान सन्मान निधीत होणार वाढ?

एकत्र राहणाऱ्या समाजाला एकमेकांचे वैरी करण्याचा काम सुरू

दुःखाने सांगावं लागतं आहे की, ओबीसींच्या घरापुढे का ढोल वाजवला जातो आहे. गुण्यागोविंदानं राहणाऱ्या समाजाला, अनेक वर्ष एकत्र राहणाऱ्या समाजाला आता एकमेकांचे वैरी का करताय तुम्ही? गावाला तुम्हाला उध्वस्त करायचं आहे का? गावं अशांत करायची आहेत का तुम्हाला? या पद्धतीनं वागणं बरोबर आहे का? हे चुकीचं आहे. छोटासा समाज आपल्या संरक्षणासाठी, हक्कासाठी त्या गावात राहत असेल. तर पाचपंजी लोकांच्या घरापुढे ढोल वाजवा, गुलाल उधळा, पण ओबीसींच्या घरापुढे जाऊन गुलाल उधळणं हे चुकीचं आहे. म्हणून माझी मोठा बंधू म्हणून मराठा समाजाला विनंती आहे की, तुम्ही या पद्धतीच्या कृत्याला समर्थन करू नका. हे चुकीचं होत आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -