घरElection 2023'हे' थेट भाजपात सामील का होत नाहीत? ठाकरे गटाची शिंदे गटावर जहरी...

‘हे’ थेट भाजपात सामील का होत नाहीत? ठाकरे गटाची शिंदे गटावर जहरी टीका

Subscribe

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता भाजपासाठी चार राज्यांत विधानसभा निवडणुकांचा प्रचार करणार आहेत. आज सगळाच नकली माल असल्याने नकली शिवसेनेची टोळी चार राज्यांत भाजपच्या प्रचारास चालली आहे. बरं, त्यांच्या प्रचाराचे मुद्दे तरी काय असणार? मोदी-शहांची भलामण करणे व शिवसेना (नकली) तुमची बटीक आहे हे दाखवून देणे, हाच त्यांचा प्रचाराचा धागा असेल. महाराष्ट्राच्या आचार, विचार आणि संस्कृतीवर पाणी टाकून हे परप्रांतात भाजपाचा प्रचार करणार. त्यापेक्षा हे थेट भाजपात सामील का होत नाहीत? असा प्रश्न लोकांना पडला आहे, अशी जहरी टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – IND Vs NED: नेदरलँड्सविरुद्ध 9 खेळाडूंनी का केली गोलंदाजी? रोहित शर्माने सांगितलं कारण…

- Advertisement -

मुख्यमंत्री शिंदे यांची एक गंमत आहे. ते स्वतःला शिवसेनेचे नेते वगैरे समजतात. त्यांच्याबरोबर असलेल्या 40 आमदारांचे व 10-12 खासदारांचे टोळके म्हणजे शिवसेना असा त्यांचा दावा आहे, पण महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत अशा अनेक टोळ्या, टोळधाडी आल्या व नामशेष झाल्या. मिंधे टोळीचे तेच हाल होतील. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांत भाजपा विजयासाठी ठाण्यातील डुप्लिकेट सेना प्रचारात उतरणार ही गंमतच आहे, अशी उपरोधिक टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात केली आहे.

शिंदे हे सुसंगत विचाराबाबत कधीच प्रख्यात नव्हते. मुळात शिवसेनेचे विचार व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका त्यांना समजली नाही. म्हणूनच ते पाच राज्यांत भाजपाच्या प्रचाराची धुणी धुण्यासाठी जात आहेत. बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नक्कीच होते. वाजपेयी-आडवाणी यांनी दिल्लीची सत्ता सांभाळली. यासाठी शिवसेनाप्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रातून भक्कम पाठिंबा मिळवून दिला, पण इतर राज्यांत जाऊन त्यांनी भाजपाच्या पखाली वाहिल्या नाहीत, असा जोरदार हल्ला ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राणीच्या बागेला सव्वा महिन्यात दोन लाख पर्यटकांची भेट; किती उत्पन्न मिळाले? वाचा…

भारतीय जनता पक्षाची राजकीय ताकद पैशाच्या मस्तीत आहे. पैसा, सत्ता व तपास यंत्रणा यामुळेच भाजपाचा जय होतो व तेच त्यांच्या विजयाचे सूत्र आहे. विचार, धोरण वगैरे नगण्य आहे. त्यामुळे शिंदे यांचे चार राज्यांत प्रचाराला जाणे हे समजण्यासारखे आहे. शिंदे व त्यांचे टोळके चार राज्यांत प्रचारास जाईल, पण हेच लोक मुंबई, ठाण्यासह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घ्यायला घाबरत आहेत. ही सुद्धा गंमत आहे, असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -