घरमहाराष्ट्रनागपूरभाजपामधून आलेल्या नाना पटोलेंना महत्त्वाची आठ पदे का दिली? काँग्रेस नेत्याचाच सवाल

भाजपामधून आलेल्या नाना पटोलेंना महत्त्वाची आठ पदे का दिली? काँग्रेस नेत्याचाच सवाल

Subscribe

 Ashish Deshmukh Allegations on Nana Patole | नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी झालेल्या काँग्रेसमधील राड्यावरून त्यांनी नाना पटोले यांनांच जबाबदार धरलं होतं. आता पुन्हा त्यांनी नाना पटोलेंना लक्ष्य केलं आहे.

 Ashish Deshmukh Allegations on Nana Patole | नागपूर – काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी पुन्हा एकदा नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या वरिष्ठ आणि समजूतदार नेत्याला डावलून भाजपातून आलेल्या नाना पटोले यांना चार वर्षांत महत्त्वाची आठ पदं का दिली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी झालेल्या काँग्रेसमधील राड्यावरून त्यांनी नाना पटोले यांनांच जबाबदार धरलं होतं. आता पुन्हा त्यांनी नाना पटोलेंना लक्ष्य केलं आहे.

सत्यजीत तांबेंसारख्या तरुण तडफदार नेत्याला काँग्रेसपासून दूर करण्यात आलं. चांगल्या तरुण नेत्यांना काँग्रेसपासून दूर करण्याचं कामच नाना पटोले महाराष्ट्रात करत आहेत. सत्यजीत तांबे यांच्यासोबत धोका झाला. त्यांचा छळ झाला. नाशिकच्या जागेसाठी नागपूर आणि औरंगाबादचे एबी फॉर्म पाठवण्याचं कारण काय होते? याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे. शिवाय हंडोरे यांच्या पराभवासंदर्भातही चौकशी झाली पाहिजे. त्यासंबंधित रिपोर्ट अजूनही प्रलंबित आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वात एकानंतर एक घोळ होत आहेत. भोंगळ कारभार सुरू आहे आणि त्यास विद्यमान प्रदेशाध्यक्ष कारणीभूत आहेत असा आरोप काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केला. नाना पटोले यांच्या कारभारावर नेतेच नाही तर कार्यकर्तेही नाराज आहेत असून अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी नेतृत्व बदल अनिवार्य आहे, असं आशिष देशमुख म्हणाले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद नाना पटोलेंकडून काढून घेण्यात यावं अशीही मागणी केली होती.

- Advertisement -

काँग्रेस अध्यक्षपदाची जशी निवडणूक घेतली तशीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपदासाठीही निवडणूक घ्या अशीही मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे. निवडणुकीच्या वेळेला काँग्रेस पक्षात नेहमी असे घोळ का होतात असा सवालही आशिष देशमुख यांनी विचारला आहे. ते म्हणाले की, “गेल्या चार वर्षात नाना पटोले यांना आठ पदे मिळाली आहेत. महाराष्ट्रात दुसरं नेतृत्व नाहीच का? एकाच नेत्याचे एवढ्या वेळेला लाड का पुरवले जात आहेत? गावागावात रुजलेली काँग्रेस आणि त्यामध्ये नेतृत्वाची खाण असताना वारंवार एकच हिरा बाहेर का निघतो? यामागे काय राज आहे? हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कळत नाही. कदाचित पक्षश्रेष्ठींना कळत असावं,” असं आशिष शेलार म्हणाले.

…म्हणून महाविकास आघाडी सरकार कोसळलं

- Advertisement -

नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपद मिळालं, मात्र त्यांनी ते सोडलं आणि त्यामुळेच पुढे विधानसभा अध्यक्षपद रिकामं राहिलं आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यासाठी नाना पटोले हेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही आशिष देशमुख यांनी केला आहे. येत्या दहा तारखेला मुंबईत आम्ही एक बैठक बोलावली आहे आणि त्यामध्ये सर्वांना निमंत्रित केलं आहे. त्यात पक्षाकडून वरिष्ठ नेते निरीक्षक म्हणून यावेत अशी आमची इच्छा असल्याचे आशिष देशमुख म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -