Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश महाराष्ट्रापेक्षा गुजरातला अधिक लस साठा का?

महाराष्ट्रापेक्षा गुजरातला अधिक लस साठा का?

Related Story

- Advertisement -

कोरोना प्रतिबंधक लसींच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकारसोबत वाद-विवादाचा विषय नाही. मात्र, महाराष्ट्रापेक्षा गुजरातलाअधिक लस साठा का? लस पुरवठ्याबाबत महाराष्ट्राशी केंद्राचा दुजाभाव का केला जातोय, असा सवाल सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी केला.

सहा कोटी लोकसंख्या असलेल्या आणि सध्या १७ हजार कोरोना रुग्ण सक्रिय असलेल्या गुजरात राज्याला लसीचे १ कोटी लसीचे डोस देण्यात आले. पण, गुजरातच्या दुप्पट लोकसंख्या आणि सुमारे साडे चार लाख सक्रिय रुग्ण असलेल्या महाराष्ट्रालाही १ कोटी, ४ लाख डोस देण्यात आले. त्यातील सुमारे ९ लाख डोस शिल्लक आहेत. त्यामुळे सातारा, सांगली, पनवेल या ठिकाणी लसीकरण बंद ठेवण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले

- Advertisement -

कोरोना लसींची संख्या आणि लसीकरण यासंदर्भात टोपे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना टोपे म्हणाले, कोरोना लसीकरणात महाराष्ट्र देशात अग्रेसर राज्य आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी दर आठवड्याला ४० लाख डोसेस देण्याची मागणी राज्याने केंद्र शासनाला केली आहे. मात्र, त्याला प्रतिसाद देताना केंद्राकडून आज साडेसात लाख डोस पाठविण्यात आले.

अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त असताना आणि देशातील एकूण रुग्णांपैकी ५५ टक्के सक्रिय रुग्ण असताना महाराष्ट्राला गरजेनुसार लसींचा पुरवठा झाला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे, असे टोपे म्हणाले. महाराष्ट्राची मागणी दर आठवड्याला ४० लाख डोस देण्याची असताना प्रत्यक्षात साडेसात लाख डोस देण्यात येणार आहेत. याबाबत गुरुवारी पुन्हा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यात १५ एप्रिलनंतर वाढ करून साडेसतरा लाख डोस पुरविण्यात येणार आहेत.

- Advertisement -