घर महाराष्ट्र मुंबई- गोवा महामार्ग का रखडला? राज ठाकरेंनी सांगितले नेमके कारण...

मुंबई- गोवा महामार्ग का रखडला? राज ठाकरेंनी सांगितले नेमके कारण…

Subscribe

मुंबई-गोवा महामार्गाचे काम मागील 17 वर्षापासून सुरू आहे. हाच प्रश्न उपस्थित करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर मागील काही दिवसांपासून टीका सुरू केली आहे.

कोलाड (रायगड) : आज तुम्ही सगळेजण मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा प्रश्नासंदर्भात काढलेल्या पदयात्रेत सहभागी झालात ही बाब जागरुकपणाची आहे. परंतू या रखडलेल्या महामार्गाच्या कामामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?, तेच सांगायला मी येथे आलोय, तुमच्या जमिनी बळकावण्याचा हा प्रयत्न असून, कवडीमोल भावाने तुमच्या जमिनी विकत घेतल्या जातील, त्यानंतर महामार्ग बनवून त्याच जमिनीचे कोट्यवधी रुपये मिळविले जाणार आहेत. म्हणून तुमच्या जमिनी विकू नका एवढेच सांगायला आलोय असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोलाड येथील सभेत कोकणवासीयांना संबोधित केले.(Why is the Mumbai-Goa highway blocked? Raj Thackeray said the exact reason…)

मुंबई-गोवा महामार्गाचे काम मागील 17 वर्षापासून सुरू आहे. हाच प्रश्न उपस्थित करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर मागील काही दिवसांपासून टीका सुरू केली आहे. दरम्यान आज अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. 84 किलो मीटरच्या या जागर यात्रेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे, संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, वसंत मोरे, राजु पाटील यांच्यासह अनेक मनसेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान आज सायंकाळी रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे या जागर यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी आयोजित समारोप सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा महामार्गाच्या रखडलेल्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली.

- Advertisement -

हेही वाचा : आमच्यावर टीका जरूर करा, पण विकासावरही बोला; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना आवाहन

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मुंबई-गोवा हायवेच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सरकारला जाग आणण्यासाठी म्हणून पदयात्रा केली. पदयात्रा हा त्यामानाने सभ्य मार्ग आहे. कारण आपल्या पक्षाचे धोरणच आहे की, पहिले हात जोडून जा आणि नाही तर हात सोडून जा. आज पदयात्रेने शासनाला काही गोष्ट सांगायचा आहेत म्हणून येथे आलो आहे. तर तुम्ही सगळेजण या जागर यात्रेत सहभागी झाले त्या सर्वांचे आभार मानत राज ठाकरे यांनी मध्यंतरी माझी शस्त्रक्रिया झाली नसती तर मीही चाललो असतो असे म्हणत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, वसंत मोरे, राजु पाटील हे माझे पदाधिकारी या प्रश्नांसाठी या पदयात्रेत चालले त्यांचे सगळ्यांचे आभार मानले.

तुम्हाला राग कसा येत नाही?

- Advertisement -

आज जागर यात्रेच्या निमित्ताने कोकणवासी सहभागी झाले जरी असले तरी या मार्गाच्या दूरवस्थेवरून कोकणी बांधव- भगिनीना राग कसा येत नाही, तीच ती माणसं निवडून कशी देता. तीच माणसं तुमच्या आयुष्याचा खेळ करतात, या महामार्गाच्या दुरवस्थेमुले किती अपघात झाले, रस्त्यावर असलेला खड्डा भरल्या जातो परूत त्या माणसाचे आयुष्य नाही भरता येत असे म्हणत राज ठाकरे यांनी कोकवासीयांच्या भावनांना हात घातला. तर मागील काही दिवसांत अडीच हजार जणांचे बळी गेले आहेत. गाड्याची विल्हेवाट लागली ती वेगळी, एवढेच नव्हे तर सभास्थळी येताना जोशी वडेवाले या दुकानासमोर हायवेवर पेवर ब्लॉक टाकले आहेत. पेव्हर ब्लॉक हे हायवेवर टाकण्याची जागा आहे का असे म्हणत झालेल्या भ्रष्टाचारावर नेमके बोट ठेवले.

हेही वाचा : आगामी लोकसभेसाठी ‘इंडिया’कडून पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरला! ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान

 

रस्त्याचे काम न होण्यामागील हे सांगितले गुपीत

यावेळी पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 17 वर्ष झाले रस्ता का होत नाही, सोपं उत्तर आहे. कारण, तुम्हाला राग येत नाही. मेल्या मनाचे पडलोय आम्ही, निवडणुकीत आम्ही बघत नाही कुणाला मतदान करतोय, निवडणुकीत तुमच्या भावनेला हात घातले की तुम्ही मतदान करता परंतू या रखडलेल्या कामामागील आजच अजेंडा सांगून ठेवतो. हात जोडून विनंती आहे. अत्यंत चिरीमिरीमध्ये तुमच्या जमिनी विकत घेणार नंतर रस्ता करणार आणि मग त्या जमिनी कोट्यवधीने विकल्या जाणार आहेत. हे दुसरे कुणी करत नाही तर कुंपणच शेत खातेय, दळवळणाच्या सोई झाल्या की, जमिनीला चांगला भाव मिळतो. तुमच्या जमिनी विकू नका व्यापाऱ्यांना देऊ नका, त्यांना काय लावायचे ते आम्ही लावू असे म्हणत राज ठाकरे यांनी रखडलेल्या कामामागील कारण सांगितले.

हेही वाचा : टाळ्यांचा न येणारा आवाज खूप बोलका, अजित पवारांच्या बारामतीतील सभेवरून रोहित पवारांचा इशारा

मीसुद्धा रिटर्न गिफ्ट देऊ शकतो

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, पनवेलच्या सभेत आदेश दिल्यानंतर मनसेसैनिकांनी या महामार्गासाठी आंदोलन केले तर पदाधिकाऱ्यांना एका दिवसांची कोठडी सुनावत जेलमध्ये अंडरवेअरवरती बसवले, पण एकच सांगतो सरकार कुणाचेही असो सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणी आले नाही. अंडरविअरची रिटर्न गिफ्ट मीही देऊ शकतो पण विचार करतो की, त्यामध्ये हे कसे दिसतील. यांच्या अंगावरील खड्डे पाहल्यापेक्षा रस्त्यावरचे खड्डे बरे. असे म्हणत सत्ताधाऱ्यांना मिश्कील टोमणा मारला. आता जागर यात्रेनंतर पुढे काय करायचे ते लवकरच सांगेल. सगळेच पेपर एकदाच फोडायचे नसतात म्हणत त्यांनी या मार्गासाठी पुन्हा एकदा आवाज उठवणार असल्याचे सुतोवाच दिले.

महामार्गासाठी साडेपंधराशे कोटी अन् चांद्रयान साडेसहा कोटीत

यावेळी राज ठाकरे यांनी मुंबई- गोवा महामार्गासाठी आतापर्यंत 15 हजार 566 कोटी रुपये खर्च झाले आहेत तर दुसरीकडे साडेसहाशे कोटीमध्ये चांद्रयान चंद्रावर गेलं. त्याचं पुढे काय झाले माहिती पण तिथे पाठविण्याची गरज नव्हती इथेच उतरवायला पाहीजे होतं कुठेतरी कारण तिकडे जाऊन खड्डेच पाहायचे आहेतर इथके पहा असे म्हणत राज ठाकरे यांनी महामार्गासाठी झालेला खर्चच सांगितला.

- Advertisment -