घरनवी मुंबईराज ठाकरेंवर गुन्हा का दाखल नाही? -सुषमा अंधारे

राज ठाकरेंवर गुन्हा का दाखल नाही? -सुषमा अंधारे

Subscribe

अंधारे यांनी माझ्या संविधानिक अधिकारावर गदा आणली जात असून भर सभेमध्ये भर सभेमध्ये विरोधकांवर टीका करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी भारतीय जनता पार्टीला केला आहे.

नवी मुंबई: भारतीय संविधानाची चौकट पुसण्याचे काम केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे. संविधानाने मला मत मांडण्याचा दिलेला अधिकार आहे. ठाण्यामध्ये झालेल्या महाप्रबोधन यात्रेनंतर अंधारे यांच्यावर शिंदे गटाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर बोलताना अंधारे यांनी माझ्या संविधानिक अधिकारावर गदा आणली जात असून भर सभेमध्ये भर सभेमध्ये विरोधकांवर टीका करणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी भारतीय जनता पार्टीला केला आहे.

नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या महाप्रबोधन यात्रेच्या जाहीर मेळाव्यात त्या बोलत होता. महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करत असताना शिंदे गटाकडून टार्गेट करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप अंधारे यांनी केला. आपण राहत असलेल्या इमारतीच्या खाली काही पोलीस पहारा देत होते तर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काहीजण आपल्या मागावर होते, असे सांगत विरोधकांकडून जिवाला धोका असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. मात्र काही झाले तरी आपण आपल्या मतांनी माझ्या पाच वर्षांच्या मुलीची जबाबदारी उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी घ्यावी, असे आवाहन केले. शिवसेना उभी करण्यासाठी मी कामी पडत असेल तर त्याची पर्वा करणार नाही, माझ्या पाच वर्षांची मुलगी देखील शिवसेनेच्या उभारणीसाठी बहाल केल्याचे सांगत भावनिकता अंधारे यांनी व्यक्त केली. शिंदे गटाचे केसरकर हे नवे बोलके पोपट आहेत. पक्ष बदलणाऱ्यांनी हिंदुत्व शिकवू नये, असा केसरकरांवर हल्लाबोल केला. तर 2014 पासून शिवसेनेच्या आमदारकीच्या जागा कमी करून सेना संपवण्याचा डाव भाजपाने सुरू केला आहे, असंही त्या म्हणाल्यात.

- Advertisement -

विचारेंचे शिंदेंना खुले आवाहन
राज्यातील भूकंपाचे केंद्रबिंदू ठाण्यात होते. काही दिवसांपूर्वी ठाण्यात भरगच्च गर्दीत झालेल्या महाप्रबोधन यात्रेचा गद्दारांनी धसका घेतला आहे. त्यांच्याकडून खोटे गुन्हे दाखल करून त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत, पाठीमागून वार करण्यापेक्षा समोर येऊन लढा, असे थेट आवाहन ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटाला केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -