घरताज्या घडामोडीमहाराष्ट्र सरकार कंगनाला सुरक्षा का देत नाही? - राम कदम

महाराष्ट्र सरकार कंगनाला सुरक्षा का देत नाही? – राम कदम

Subscribe

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ड्रग्जशी संबंधित नेते-अभिनेत्यांची नावे सांगण्यास तयार असल्याचे स्वतः तिने सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार कंगनाला सुरक्षा का देत नाही? असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी सरकारला विचारला आहे. याबाबत राम कदम यांनी ट्विट केले आहे.

राम कदम यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘कंगना ड्रग्जशी संबंधित नेते- अभिनेत्यांची नावे सांगण्यास तयार आहे. याचे सर्वांनी स्वागत केले. याला चार दिवस उलटून गेल्यानंतरही महाराष्ट्र सरकारने तिला सुरक्षा रक्षक का दिले नाहीत? रियाचे वकील किंवा दलाल असल्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकारची कुणाला तरी लपवण्याची आणि वाचवण्याची इच्छा आहे?’

- Advertisement -

याविषयी राम कदम एका मराठी वृत्तवाहिनी बोलताना म्हणाले की, ‘या ड्रग्ज माफियामध्ये कोणते नेते, अभिनेते आहे याबाबत कंगना स्वतः सांगण्यास तयार आहे. या गोष्टीच स्वागत संपूर्ण देशाने केले. कंगना मुंबईतील खार येथे राहते. महाराष्ट्र सरकारने स्वतःहून तिला विचारायला हवे की, ‘आम्ही तुला सुरक्षा देतो कोणती नावे आहेत ती आम्हाला सांग.’ अशी अपेक्षा महाराष्ट्र सरकारकडून होती. चार दिवस उलटून गेले तरी महाराष्ट्र सरकारकडून शून्य प्रतिक्रिया आहे. याचा अर्थ असा होतो की, ‘कंगना जी नाव सांगणार आहे यामुळे महाराष्ट्र सरकार अडचणी येईल म्हणून सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.’

- Advertisement -

हेही वाचा – Man Ki Batt : भारतात खेळणी उद्योगाला चालना देणार – पंतप्रधान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -