बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) आज बारामती दौऱ्यावर (Baramati tour) आहेत. या दौऱ्यादरम्यान बारामतीत दाखल होताच त्यांचं जोरदार जंगी स्वागत करण्यात आलं. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांचा हा पहिलाच बारामती दौरा आहे. बारामतीत अजित पवार यांच्यावर जेसीबीमधून जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर बारामतीकरांना संबोधित करताना बंडखोरी करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात (PM Narendra Modi) सभा का घेतली याचं कारण सांगितलं आहे. (Why meetings were held against the Prime Minister before the rebellion Ajit Pawar told Baramatikars because)
हेही वाचा – फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराने आम्ही काम करत आहोत – अजित पवार
अजित पवार यांनी अनेक विकासकामांचे उदाहरण देताना म्हटले की, मी आज सत्तेत आहे, पण कधीकाळी मी मोदींच्या विरोधात सभा घेतल्या हे मान्य करतो. कारण नंतरच्या काळात काम कसं होणार हे मला माहित नव्हतं. आज बारामती डोळ्यासमोर ठेवली तर फलटण मार्गोचे 700 कोटी रुपयाचे काम मंजूर झालं आहे. हे काम नक्की पूर्ण होणार आहे. याशिवाय भिगवण-बारामती रस्त्याचे काम, पालखी मार्गाचे काम सुरु आहे, असे अजित पवार म्हणाले.
बारामतीकरांमुळेच मी इथंपर्यंत पोहचलो
राज्याच्या तिजोरीची चावी सुदैवाने माझ्याकडे आहे. मी बारामतीकरांमुळे इथंपर्यंत पोहचलो आहे. त्यामुळे सर्व तालुक्यांसाठी मी निधी आणेल. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जलसंपदा विभाग आहे. त्यामुळे मी त्यांना विकासकामांसाठी विनंती करेल. त्यांनी मंजूरी दिली तर मी देईल. जिल्ह्यातील महत्वाची कामे मला करायची आहेत. पुणे-नगर-नाशिक रेल्वेसाठी मी पाठपुरवठा करणार आहे. यासाठी मी दिल्लीत देखील जाणार आहे. विकासकामे करताना अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतात. भावना असते, श्रद्धा असते, पण नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागतो. लोक टीका करतात, पण नव्या पिढीला माहित आहे, हे सर्व बारामतींकरांसाठी मी करतो, असंही यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा – Eknath Shinde : ‘शरद पवार बोलतात त्याच्या नेमका उलटा अर्थ घ्यायचा’, मुख्यमंत्री असं का म्हणाले…
‘मी सत्तेला हपापलेला कार्यकर्ता नाही
महाराष्ट्रातील एकाही घटकाला असुरक्षित वाटू नये, राज्यात कुठल्याही घटकाला असुरक्षित वाटणार नाही, बारामतीत येताना पिकं सुकलेली दिसली, त्यासाठी राज्य सरकार योग्य निर्णय घेणार, असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं. मी सत्तेला हपापलेला कार्यकर्ता नाही,सत्ता येत असते, जात असते, असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. संकटात लोकांना आधार द्यावा लागतो, पुरंदर उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव मांडणार,राज्यात पाणीसाठ्याची परिस्थिती चिंताजनक, चांगल्या पावसासाठी मयूरेश्वराला साकडं घालणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.