Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र परमबीर सिंह एनआयएच्या आरोपपत्रात आरोपी का नाहीत

परमबीर सिंह एनआयएच्या आरोपपत्रात आरोपी का नाहीत

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल

Related Story

- Advertisement -

पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्या माध्यमातून अनिल देशमुख यांच्या विरोधात घटनाक्रम घडवण्यात आला. परमबीर यांना वाचवण्यासाठी एनआयएने त्यांना आश्वाासित केले. त्यामुळे एनआयएच्या आरोपपत्रात सिंह यांना आरोपी करण्यात आले नाही. त्यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करण्याचे कटकारस्थान भाजपच्या माध्यमातून झाले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना केला आहे.

एनआयएने जे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये सायबर तज्ज्ञांच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्यासाठी ५ लाख रुपये परमबीर सिंह यांनी दिले होते, असे सायबर तज्ज्ञाने सांगितले असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. एनआयएच्या आरोपपत्रात जे मुख्य आरोपी आहेत त्यांची चौकशी झाली नाही. त्यांना आरोपी करण्यात आले नाही. खंडणीसाठी हे कटकारस्थान सचिन वाझेने केले आहे. त्यात पूर्ण सत्य आहे असे आमचे मत नाही. बरेचसे काही यातून बाहेर येऊ शकत होते. परंतु एनआयएने तसा काही तपास केला नाही. काही लोकांना वाचवण्यासाठी काम केले आहे. परमबीर यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याने त्यांना जीवदान दिल्याचा गंभीर आरोपही मलिक यांनी केला.

- Advertisement -

सायबर तज्ज्ञाला देऊ केली होती पाच लाखांची लाच
अँटिलिया स्फोटके प्रकरणात तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भूमिका समोर आली आहे. ‘जैश-उल- हिंद’ या कथित अतिरेकी संघटनेचे पत्रक तयार करून त्याचा टेलिग्राम पाठवण्यासाठी परमबीर सिंह यांनी एका सायबर तज्ज्ञाला पाच लाख रुपये दिल्याचे या सायबर तज्ज्ञाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रातून ही बाब उघडकीस आली आहे. दरम्यान, मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट देखील मुंबई पोलीस मुख्यालयातच शिजला असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. या हत्येची जबाबदारी पूर्णपणे प्रदीप शर्मा याने घेतल्याचे आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -