घरमहाराष्ट्रअटक होताना भगवा गळ्यात कशाला? अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना प्रश्न

अटक होताना भगवा गळ्यात कशाला? अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना प्रश्न

Subscribe

तसेच, दोन फोटो पोस्ट करून सत्ता स्थापन करताना भगवा नव्हता, मग अटक होताना भगवा गळ्यात कशाला, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

सत्ता स्थापन करताना भगवा नव्हता, मग अटक होताना भगवा गळ्यात कशाला? असा सवाल विचारत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊतांना काल ईडीने ताब्यात घेतल्यानंतर कारच्या सनरुफमधून बाहेर येऊन शिवसैनिक आणि समर्थकांना हात दाखवून अभिवादन केले. त्यावेळी त्यांच्या गळ्यात भगवा गमछा होता. म्हणून अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. (Why saffron around the neck while being arrested? Atul Bhatkhalkar’s question to Sanjay Raut)

हेही वाचा – राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्याचा वाद दाबण्यासाठीच संजय राऊतांना अटक, शिवसेनेचा दावा

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी रविवारी सकाळीच ईडीचे अधिकारी दाखल झाले होते. घरात साडेनऊ तास चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून अकरा लाखांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच, पुढील चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आलं. ईडी कार्यालयात जाताना त्यांचr आई आणि पत्नी भावूक झाले होते. आईने औक्षण करून राऊतांना निरोप दिला. दरम्यान, संजय राऊतांनी बाहेर येऊन आपल्या कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन केलं. तसेच, कारच्या सनरुफमध्ये येऊनही त्यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन केलं. यावेळी त्यांच्या गळ्यात भगवा गमछा होता.
यावरून अतुल भातखळकर यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, ‘भगवा हा सोयीचा विषय नाही की तुम्ही अडचणीत असाल तेव्हा वापरावा, नसेल तेव्हा काढून ठेवावा.’ तसेच, दोन फोटो पोस्ट करून सत्ता स्थापन करताना भगवा नव्हता, मग अटक होताना भगवा गळ्यात कशाला, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.


हेही वाचा – संजय राऊतांना अखेर अटक, ईडीकडून तब्बल १७ तास चौकशी

- Advertisement -

त्याआधी ‘चढता है सूरज ढलता है, यह झूठ न ज्यादा चलता है, पल दो पल का उजाला है झूठ का, अरे काला है जी काला मूह काला है झूठ का,’ असं म्हणतही त्यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यासाठी त्यांच्यावर ईडीने तब्बल चारवेळा समन्स बजावले. मात्र, ते एकदाच ईडी चौकशीला हजर राहिले. त्यानंतर पावसाळी अधिवेशनसाठी ते दिल्लीत असल्याने ईडी चौकशीला येऊ शकले नाहीत. अखेर, ईडीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळीच संजय राऊतांच्या घरी धाड टाकून त्यांच्यावर कारवाई केली.

हेही वाचा – संजय राऊतांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली, ईडी कार्यालयाबाहेर करणार आंदोलन

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -