मलिकांनी कशाला, सरकारनेच राजीनामा दिला पाहिजे, नारायण राणेंचा सरकारवर निशाणा

आज आंगणेवाडी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी सरकारवर निशाणा साधला. देशद्रोही मंत्र्याला कॅबिनेटमध्ये स्थान दिले आणि त्याही राष्ट्रवादीच्या, आता त्याच्या समर्थनार्थ सर्वच जण बोलत आहेत. नवाब मलिक यांच्याबद्दल बोलायचा कुणालाच अगदी मुख्यमंत्र्यांना देखील नैतिक अधिकार नाही.

narayan rane

नवी दिल्लीः अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपा करीत असताना आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. यावेळी बोलताना ते म्हणाले, देशद्रोही मंत्र्याला कॅबिनेटमध्ये घेणाऱ्या सरकारनेच खरं तर राजीनामा दिला पाहिजे. हिंदुत्ववादी विचाराच्या बाळासाहेबांचा पक्ष सत्तेसाठी लाचार झालाय. नवाब मलिक यांच्या समर्थनासाठी उपोषण करणाऱ्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक झाली पाहिजे, असेही राणे यावेळी म्हणालेत.

आज आंगणेवाडी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी सरकारवर निशाणा साधला. देशद्रोही मंत्र्याला कॅबिनेटमध्ये स्थान दिले आणि त्याही राष्ट्रवादीच्या, आता त्याच्या समर्थनार्थ सर्वच जण बोलत आहेत. नवाब मलिक यांच्याबद्दल बोलायचा कुणालाच अगदी मुख्यमंत्र्यांना देखील नैतिक अधिकार नाही. कडवट हिंदुत्ववादी बाळासाहेबांचा पक्ष आज लाचारीने वागतोय. पदासाठी देशद्रोही लोकांचं समर्थन करत आहे. समर्थनासाठी उपोषण देखील करत आहेत. यासारखी वाईट गोष्ट कोणती? या उपोषणाला बसणाऱ्या लोकांना देखील देशद्रोहाच्या कायद्याखाली अटक झाली पाहिजे, असेही यावेळी राणे म्हणाले.

राज्यात शिवसेनेचे फक्त 56 आमदार आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी 145 लागतात. सत्तेसाठी लाचारी पत्करून यांनी हिंदुत्वाचा त्याग केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले आहेत. पुढच्या वेळी पाच देखील येणार नाहीत, असे नारायण राणे यावेळी म्हणाले.