Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी महापुरुषांचा अपमान होत असताना भाजपा नेत्यांची तोंडे बंद का होती? नाना पटोलेंचा...

महापुरुषांचा अपमान होत असताना भाजपा नेत्यांची तोंडे बंद का होती? नाना पटोलेंचा सवाल

Subscribe

'भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. उलट राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत, त्यावर भाजपाने नाहक आरोप करणे बंद करावे', असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला.

‘भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. उलट राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत, त्यावर भाजपाने नाहक आरोप करणे बंद करावे’, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला. विधानसभा व लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नाना पटोलेंनी भाजपावर हल्लाबोल केला. (Why was BJP mouth closed when great men were being insulted The question of nana patole Congress)

“भारतीय जनता पक्षाने सातत्याने महापुरुषांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यांच्याबदद्ल भाजपाच्या मंत्र्यांनी केलेली विधाने जनता विसरलेली नाही”, अशा शब्दांत नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेली अवमानजनक वक्तव्ये भाजपाला मान्य आहेत का? महापुरुषांचा अपमान करत असताना भाजपाची तोंडे बंद का होती? असे सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला.

- Advertisement -

“भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. उलट राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत, त्यावर भाजपाने नाहक आरोप करणे बंद करावे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजपा नेत्यांनी जनतेची माफी मागितलेली नाही”, असे नाना पटोले म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपतींच्या स्मारकाचे उद्घाटन केले त्याचे काय झाले? याचे उत्तर आधी द्या. भाजपाला महापुरुषांच्या विचारांशी काहीही देणेघेणे नाही. भाजपा त्यांचा फक्त मतांसाठी वापर करते. भाजपाने त्यांचे थोतांड बंद करावे. भाजपाचे हिंदुत्व नकली आहे”, असेही नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

“गोव्यात गोमातेबद्दल काय भुमिका आहे आणि महाराष्ट्रात काय भूमिका आहे हे सर्वांना माहित आहे. स्वतःच्या सोईने हिंदुत्वाचा वापर करणाऱ्या भाजपाची खरा चेहरा जनतेला माहित आहे. त्यावर त्यांनी आम्हाला शिकवू नये”, असाही हल्लाबोल नाना पटोले यांनी केला.


हेही वाचा – कोल्हापुरातील एका इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

- Advertisment -