घरमहाराष्ट्रमग इस्त्रायलमध्ये शेती तंत्रज्ञान शिकण्यासाठी कृषी अधिकारी का पाठवले नाहीत? सचिन सावंतांचा...

मग इस्त्रायलमध्ये शेती तंत्रज्ञान शिकण्यासाठी कृषी अधिकारी का पाठवले नाहीत? सचिन सावंतांचा फडणवीसांना सवाल

Subscribe

इस्त्रायली पेगॅसस स्पायवेअरच्या मदतीने देशातील पत्रकार, राजकीय नेते, अधिकाऱ्यांचे फोन टॅप करुन हेरगिरी करण्यात आल्याचा दावा काही मीडिया संस्थांनी केला. यावरुन देशातील वातावरण तापलं असून याचे पडसाद राज्यात देखील उमटले आहेत. फडणवीस सरकार असताना राज्यातील काही नेत्यांचे फोन टॅप केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप फेटाळले. यावेळी त्यांनी बोलताना DGIPR चं शिष्टमंडळ इस्त्रायलला शेती तंत्रज्ञान शिकण्यासाठी गेले होते असं सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांचा हाच मुद्दा पकडत महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. “फडणवीस साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे माहिती आणि जनसंपर्क विभागाचे अधिकारी शेती आणि शेती तंत्रज्ञान शिकण्यासाठी इस्त्रायल ला गेले होते. माहितीसाठी – इस्त्रायल दौऱ्याचा विषय ‘To study new trends in Government outreach programs and new ways of utilising social- web media’ होता” असं सचिन सावंत यांनी म्हटलं. सचिन सावंत यांनी कोणते विषय अभ्यासले याची यादी दिली आहे. यामध्ये शेती हा शब्द नाही आणि जर असता तर कृषी विभागाचे अधिकारी का पाठविले नाहीत? असा सवाल त्यांनी केला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले होते फडणवीस?

“इस्त्रायलमध्ये DGIPR चं शिष्टमंडळ गेलं होतं. ते ही कधी गेले होते त्याच्या तारखा जर आपण पाहिल्या तर निवडणुकीच्या नंतर गेले आहेत. त्यांचा दौरा आधी ठरला होता. इस्त्रायलमध्ये शेती आणि शेती तंत्रज्ञान या संदर्भातली माहिती घेण्यासाठी गेले होते,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -