Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम धक्कादायक! दारुड्या नवऱ्याला वैतागून पत्नीने ५ मुलींसह ट्रेनसमोर उडी मारुन केली आत्महत्या

धक्कादायक! दारुड्या नवऱ्याला वैतागून पत्नीने ५ मुलींसह ट्रेनसमोर उडी मारुन केली आत्महत्या

पाच जणींनी रेल्वे समोर उडी घेतल्यावर मृतदेह जवळपास ५० मीटरपर्यंत विखुरले

Related Story

- Advertisement -

आत्महत्येच्या घटना नेहमीच मन सुन्न करतात. छत्तीसगडमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने आपल्या पोटच्या पाच मुलींना घेऊन धावत्या ट्रेनसमोर उडी मारुन आपले आयुष्य संपवले. दारुड्या पतीच्या जाचाला वैतागून पत्नीने आत्महत्या करण्याचे अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. छत्तीसगडच्या इमलीभांडा नदीच्या जवळील रेल्वे ट्रॅकवर गुरुवारी सकाळी मृतदेह छिन्नविछिन्न होऊन पडलेले आढळले. पाच जणींनी रेल्वे समोर उडी घेतल्यावर मृतदेह जवळपास ५० मीटरपर्यंत विखुरले गेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण छत्तीसगड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Wife commits suicide by jumping in front of train with 5 daughters in Chattisgarh)

छत्तीसगड येथील बेमचा गावात ४५ वर्षीय उमा साहू तिच्या पाच मुली आणि नवरा केजराम साहू हे सात जण राहत होते. अन्नपूर्ण,यशोदा,भूमिका,कुमकुम आणि तुलसी अशा त्यांच्या पाच मुलींची नावे आहेत. केजरामला दारुचे व्यसन होते. त्याच्यांत दररोज वाद होत असत. दररोज पत्नी आणि मुलींना मारहाण करत असे. बुधवारीही नेहमीप्रमाणे केजराम दारुच्या नशेत घरी आला. केजराम आणि उमा यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर उमा आपल्या पाचही मुलींना घेऊन घराबाहेर पडली. त्यानंतर या माय लेकींचा ठाव ठिकाणा लागला नाही.

- Advertisement -

गुरुवारी सकाळी इमलीभांडा नदीच्या जवळील रेल्वे ट्रॅकवर मृतदेह पडल्याचे स्थानिकांनी पाहिले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. रात्री ७:३० वाजताच्या सुमारात या मायलेकी घराबाहेर पडल्या त्यानंतर ९:३० वाजताच्या सुमारास त्यांनी लिंक एक्सप्रेससमोर उड्या मारुन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. सहा पैकी दोन मृतदेह रेल्वे ट्रॅकवर पडले होते. तर बाकीचे मृतदेह काही अंतरावर सापडले. रेल्वे ट्रॅकवर काही चपलाही पडल्या होत्या.  स्थानिकांनी या मृतदेहांची ओळख पटवली. या घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.


हेही वाचा – गावठी कट्टा, जीवंत काडतुसे बाळगणार्‍यास अटक

- Advertisement -