घरमहाराष्ट्रउच्च दाबाच्या विद्युत प्रवाहाने केली वन्यप्राण्याची शिकार

उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहाने केली वन्यप्राण्याची शिकार

Subscribe

उच्चदाबाच्या विद्युतप्रवाहाद्वारे वन्यप्राण्याची शिकार करण्याची घटना उघडकीस आली आहे. अधिकाऱ्यांच्या हलगरजी पणामुळे ही घटना घडली असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.

उच्चदाबाचे विजेचा झटका देऊन वन्यप्राण्याची शिकार केली असवल्याचा प्रकार गडचिरोली येथे समोर आला आहे. गडचिरोली येथील आलापली वनपरिक्षेत्रातील कक्ष कम्रांक २७ मध्ये ६६ KV उच्च दाबाचा विद्युत प्रवाह सोडून ही शिकार करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

कसा घडला प्रकार

या जंगलात वन्यप्राण्याचे आवागमन असते. ही बाब अज्ञात विद्युत तार लावणाऱ्या व्यक्तीला माहिती असावी. याचा फायदा घेवून तेथे विद्युत वायरीचे जाळे आणि त्याच जाल्यात घोडेनील वन्यप्राण्याला उच्चदाबाच्या ताराच स्पर्श होवून जागीच गतप्राण झाला. ही घटना ११ डिसेंबरच्या रात्री घडली. पोलिसांनी घटना स्थळावरून ७०० मीटर लांब विद्युत तार हस्तगत केली आहे.

- Advertisement -

२७ क्रमांक जंगलातील घटना

चंद्रपूर आलापली मेन रोडला लागुन २७ क्रमाकाचे जंगल आहे या ठिकाणी घटनेच्या ठिकानपासुन वन विभाग बल्लारपुर क्रमांक २ चे डेपो आहे. रोज १० ते २० वनमजूर येथे काम करतात. घटनाही रोड वरुण स्पष्ट दिसते आणि त्याच रोडच्या बाजूने ६६ kv ची लाइन गेली आहे. या लाइनमधूच विज घेतली गेली असल्याचा संक्षय व्यक्त केला जातोय. दरम्यान अधिकाऱ्यांना याची माहिती पडल्यास त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वन्यप्राण्याला शवविच्छेदनासाठी पाठवले. वन विकास प्रकल्पाचे अधिकारी याचे कारण स्पष्ठ करीत नसले तरी कुठेतरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांचीच चूक असल्याने घटना कुणालाही बाहेर माहिती न जावू दिल नाही असे स्थानिकांनी म्हटलं आहे. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारीमुळे वन्यप्राण्याचा बळी जात असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -