घरमहाराष्ट्रSanjay Gaikwad : गायकवाड यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल होणार? युवकांना मारहाण केल्याचा...

Sanjay Gaikwad : गायकवाड यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल होणार? युवकांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल

Subscribe

मुंबई : आपल्या बेधडक आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी महिलेला धमकावून जमीन बळकावल्याप्रकरणी आणि वाघाच्या शिकार संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच आता संजय गायकवाड यांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीत युवकांना मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. (Will a case be filed against Sanjay Gaikwad again The video of youths being beaten is viral)

हेही वाचा – Prakash Ambedkar : “आम्ही स्वतंत्र लढलो तर…”; जागावाटपाच्या चर्चेदरम्यान पुन्हा नाराजीचा सूर

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शिवजयंतीच्या मिरवणुकीमधील मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आमदार संजय गायकवाड हे युवकांना मारहाण करताना दिसत आहेत. संजय गायकवाड हे बॉडीगार्डची काठी घेऊन युवकांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे संजय गायकवाड युवकांना मारहाण करत असताना पोलीस कर्मचारी त्याठिकाणी उपस्थित असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ बुलढाणा शहरातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – Politilcs : ‘सत्तेच्या मलिद्यासाठी एकत्र आलेले बोके…’; शिवेसना आमदारांच्या वादानंतर ठाकरे गटाची टीका

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वीच संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

दरम्यान, नागपूर येथील रीटा उपाध्याय यांची राजूर येथील दीड एकर शेतजमीन बळकावल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांच्यावर आहे. त्यामुळे संजय गायकवाड यांच्यावर दोन दिवसांपूर्वीच जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवास त्यांचा मुलगा मृत्यूंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याआधी वाघाच्या शिकार संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून संजय गायकवाड यांच्याविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -