Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्र"मराठी माणसाला घर नाकारणाऱ्यांवर कारवाई करणार की...", आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

“मराठी माणसाला घर नाकारणाऱ्यांवर कारवाई करणार की…”, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Subscribe

मुंबई : मराठी माणसाला घर नाकारणाऱ्यांवर कारवाई करणार की दिल्लीश्वरांपुढे हे सरकार हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसणार?, असा सवाल ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. मुंबईच्या मुलुंड भागातील तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला घर नाकरल्याचा धक्कादायक प्रकार घडला. हा सगळा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्यानंतर मनसेने त्या ठिकाणी धाव घेते. मनसेच्या स्टाईने सोसायटीच्या सेक्रेटरीला माफी मागण्यास भाग पडाले. या महिलेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर मराठीच्या मुद्द्या पुन्हा एकदा ऐरणीवर आला. यानंतर अनेक राजकीय पक्षांनी यावर कडव्या शब्दात टीका केली आहे.

आदित्य ठाकरेंनी ट्वीट करत म्हटले, “चीड आणणारी घटना…पण प्रश्न हा आहे, की हे पाहून मिंधे-भाजपा सरकार काय करणार? आमच्या मराठमोळ्या वारकऱ्यांवर, बारसूमधल्या महिलांवर, मराठा समाजावर लाठ्या चालवल्या… तसा इथेही कायद्याचा धाक दाखवणार, की दिल्लीश्वर नाराज होतील म्हणून ‘हाताची घडी तोडांवर बोट’ ठेवून गप्प बसणार?
ह्या बिल्डींगवर कारवाई होणार का? उद्या BMC आणि पोलीस पाठवणार का? की ‘थॅंक यू’ म्हणून बुलेट ट्रेनच्या कामाला वेग देणार? हिम्मत करा! कायद्याचा धाक ‘इथे’ दाखवा! महाराष्ट्र बघतोय! अतिशय संतप्त करणारी ही घटना!”

- Advertisement -

हेही वाचा – मराठी माणसाला घर देण्यास नकार देणारा व्हिडीओ व्हायरल; मनसेने शिकवला धडा

- Advertisement -

व्हायरल व्हिडीओमध्ये तृप्ती देवरुखकरांनी नेमके काय म्हटले

जितके म्हणून राजकीय पक्ष आहेत त्या सर्वांनी मराठी पाट्या काढा. मराठी माणसाचा राजकारणासाठी वापर करणे बंद करा. मुंबईत मराठी माणसाची काय किंमत आहे ते जाणवलं. मुलुंड वेस्टमध्ये शिवसदन सोसायटीमध्ये ऑफिससाठी जागा पाहायला गेल्यानंतर त्या ठिकाणच्या गुजराती सेक्रेटरीने मराठी माणसांना घरं देणार नाही असं म्हटलं. नियमावली मागितली तर उलट धमकी दिली. पोलिसांना सांगा नाहीतर आणखी कुणाला सांगा असं सांगत आपला हात पकडला, पतीला धक्काबुक्की केली. शूट करायला गेले तर फोन काढून घेतला. यांना एवढा माज आलाय की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला सांगतात की तुम्हाला सोसायटीमध्ये परवानगी नाही. मराठीच्या नावावर राजकारण करणारे कुठे आहेत? अशा माणसांना पोसत असाल तर दुर्दैव आहे. हे माझं रडणं नाही, तर संताप आहे. आज मला अनुभव आला तो प्रातिनिधीक आहे. अशा किती मराठी माणसांना हा अनुभव आला असेल आणि किती जणांना घरं नाकारली असतील? अशा आशयाचा व्हिडीओ तृप्ती देवरूखकर यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेत संबंधित व्यक्तीची कानउघडणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -