Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी देशमुखांनंतर अनिल परब राजीनामा देणार ? काँग्रेसचा सवाल

देशमुखांनंतर अनिल परब राजीनामा देणार ? काँग्रेसचा सवाल

शिवसेना पुन्हा वसुलीमध्ये अडकली

Related Story

- Advertisement -

अंबानी स्फोटक प्रकरणामध्ये एनआयएच्या ताब्याब असलेल्या सचिन वाझेंनी एनाआयए न्यायालयात सादर केलेल्या पत्रात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल परब यांनी खंडणी मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी केले आहेत. त्यामुळे माजी आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर सचिन वाझेंनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. सचिन वाझेंनी केलेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडीवर पुन्हा विरोधकांनी निशाणा साधला आहे परंतु सत्तेत असलेल्या काँग्रेस नेत्यानेच अनिल परब राजीनामा देणार का? असा सवाल उपस्थित केला आहे.

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विट करत परिवहन मंत्री अनिल परब राजीनामा देणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. संजय निरुपम यांनी ट्विट केले आहे की, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेनी खळबळजनक खुलासा केला आहे. ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यावर खंडणी मागण्याचा आदेश दिला असल्याचा आरोप केला आहे. यामुळे शिवसेना पुन्हा अडकली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच वाझेंनी आरोप केलेले मंत्रीही राजीनामा देणार का? नैतिकतेचा प्रश्न आहे असा टोलाही काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी लगावला आहे.

अनिल परब यांच्यावर काय आरोप

- Advertisement -

सचिन वाझेंनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केलाय की एसबीयुटी प्रकल्पाच्या ट्रस्टींकडून ५० लाख रुपये मागितले. त्यांनी दुसरा आरोप केलाय की जानेवारी २०२१ला मुंबई पालिकेच्या कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्या. परंतु या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत असे म्हणत अनिल परब यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. मी आरोप नाकारतोय. मी सच्चा शिवसैनिक आहे. माझ्यावर खंडणीचे कोणतेही संस्कार नाहीत, असेही परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.

- Advertisement -