घरमहाराष्ट्र...तर मी पहिली पदवीधर महिला आमदार असेन; शुभांगी पाटील यांचा दावा

…तर मी पहिली पदवीधर महिला आमदार असेन; शुभांगी पाटील यांचा दावा

Subscribe

मुंबई – नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने सत्यजित तांबे यांचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अपक्ष आमदार शुभांगी पाटील आज मातोश्रीत दाखल झाल्याने त्यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या पाठिंब्याबाबत शुभांगी पाटील यांनी अधिकृतरित्या काहीही स्पष्ट केले नाही. मात्र, मविआने पाठिंबा दिल्यास मी पहिली पदवीधर महिला आमदार असेन, असा विश्वास शुभांगी पाटील यांनी आज व्यक्त केला. महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर शुभांगी पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. पाच जागांवर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुका होणार आहेत. यामध्ये महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा असा सामना रंगलेला असताना नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉ.सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, त्यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेत सत्यजित तांबेंना अपक्ष म्हणून उभे केले. यामुळे महाविकास आघाडीत खळबळ माजली. कोणालाही विश्वासात न घेतल्याने सुधीर तांबेंनी उमेदवारी मागे घेतल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नाराजी व्यक्त करत सत्यजित तांबे यांचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे ते आता भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं. नाशिकमधून २२ जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवले असले तरी एकाही अधिकृत पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही. त्यामुळे ही लढत एकतर्फी होण्याची शक्यता होती. मात्र, नाशिकमधील निवडणूक बिनविरोध होणार नाही, असं संजय राऊत यांनी सकाळीच ठणकावून सांगितलं होतं.

- Advertisement -

काँग्रेसला नाशिकमध्ये धोबीपछाड मिळाल्यानंतर पुढील रणनीती आखण्यासाठी मातोश्रीवर आज महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत नाशिकच्या अपक्ष आमदार शुभांगी पाटीलही हजर होत्या. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. तसंच, ठाकरे गटाने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, पाठिंब्याबाबतची अधिकृत माहिती पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात येईल, अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली. तसंच, त्यांनी समर्थन दर्शवल्यास मी पहिली पदवीधर महिला आमदार ठरेन, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

काय म्हणाल्या शुभांगी पाटील

- Advertisement -

शिक्षक संघटनेच्या माध्यमातून मी तळागाळातील शिक्षक बांधवांसाठी दहा वर्षे काम केलं आहे. आझाद मैदानावर अन्नत्याग करून त्यांच्या मागण्या मांडल्या आहेत. त्यामुळे गेली दहा वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीला नक्कीच संधी देण्याची मी मागणी केली आहे. पक्षश्रेष्ठींसोबत माझं बोलणं झालं आहे. मी पाठिंब्याची मागणी केली आहे. त्यांचा जो काही निर्णय असेल तो त्यांचे प्रतिनिधी येऊन कळवतील. महाविकास आघाडीने मला पाठिंबा तर मी पहिली पदवीधर महिला आमदार ठरेन, असं शुभांगी पाटील म्हणाल्या.

राजा का बेटा राजा नहीं बनेगा

राजा का बेटा राजा नहीं बनेगा. जो काम करतो, ज्याची पात्रता तो आमदार बनले, असंही यावेळी शुभांगी पाटील म्हणाल्या.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -