Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रMaharashtra CM : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी माझे नाव...; काय म्हणाले मुरलीधर मोहोळ

Maharashtra CM : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी माझे नाव…; काय म्हणाले मुरलीधर मोहोळ

Subscribe

विद्यमान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर नव्याने येणारा मुख्यमंत्री हा देखील मराठा चेहरा असावा, या दृष्टीने देखील प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते. या चर्चांदरम्यान, पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव अनपेक्षितरित्या चर्चेत आले होते. मात्र स्वत: मोहोळ यांनीच ही चर्चा खोडून काढत स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून बरोब्बर आठवडा उलटला आहे. सत्तेत असलेल्या महायुती सरकारला पूर्ण बहुमत मिळूनही अजून राज्यात नवीन सरकारचा शपथविधी झालेला नाही. महायुतीतील भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांचाच मुख्यमंत्री होणार हे जरी निश्चित झाले असले तरी अद्याप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरलेला नाही. त्यातच आता मुख्यमंत्रिपदासाठी अनेक नावे समोर येत आहेत. (will bjp leader muralidhar mohol be the new chief minister he gave an explanation on the ongoing discussions)

विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपला असून नवीन सरकारच्या शपथविधीची सगळेच आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान, शपथविधीला वेळ लागत असल्याने मुख्यमंत्रि‍पदासाठी भाजपमधून वेगवेगळ्या नावांची चर्चा होऊ लागली आहे. वास्तविक, विद्यमान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर नव्याने येणारा मुख्यमंत्री हा देखील मराठा चेहरा असावा, या दृष्टीने देखील प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते. या चर्चांदरम्यान, पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव अनपेक्षितरित्या चर्चेत आले होते. मात्र स्वत: मोहोळ यांनीच ही चर्चा खोडून काढत स्पष्टीकरण दिलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : पाच तारखेपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील सांगता येत नाही; काय म्हणाले राऊत?

आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमताने घेतले जातात. पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन असल्याची पोस्ट मोहोळ यांनी सोशल मीडियावर केली आहे.

- Advertisement -

मोहोळ म्हणतात, समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना आम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला ऐतिहासिक कौल दिला आहे.
आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्ष शिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन असल्याचे ते शेवटी सांगतात.

मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या नावाची चर्चा गैरलागू असल्याचे सांगतानच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढवल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तेच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचे ते सांगू पाहात आहेत.

हेही वाचा – Mumbai Local : केंद्राकडून मुंबईसाठी 300 नव्या लोकलचं गिफ्ट

दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांचे नाव समोर आले तेव्हा महाराष्ट्रातही भाजपा धक्कातंत्र राबवणार का अशी चर्चा होती. राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपने अनेक अनुभवी नेत्यांना बाजूला सारत नवख्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. पुण्याचे असलेले मुरलीधर मोहोळ हे मराठा समाजातील आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असून भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा अशी त्यांची ओळख आहे. यंदा पहिल्यांदाच खासदार झालेल्या मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही जागा मिळाली आहे.


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -