घरताज्या घडामोडीसिंगापूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ५० विद्यार्थ्यांना मायदेशात आणणार - उदय सामंत

सिंगापूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ५० विद्यार्थ्यांना मायदेशात आणणार – उदय सामंत

Subscribe

उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला आहे.

राज्यातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने विमान सेवा खंडित केली आहे. यामुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांचा परतीचा प्रवास बंद झाला आहे. दरम्यान, सिंगापूरमध्ये महाराष्ट्राचे ५० विद्यार्थी अडकले आहेत. सिंगापूर विमानतळावर अडकलेल्या महाराष्ट्रातील या ५० विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी तातडीने मदत करणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क सुरु असून यासंदर्भात खासदार शरद पवार आणि विनायक राऊत यांच्या मार्फतही सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लवकरच या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणले जाईल, असे सामंत म्हणाले. उदय सामंत यांनी तन्वी बोडस या विद्यार्थिनीशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी राज्यशासन केंद्र सरकारच्या मदतीने सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचा विश्वास दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ आयसोलेशन कक्षात!

सध्या राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ४५ वर पोहोचली आहे. दरम्यान, कोकणात पहिला करोनाचा रुग्ण आढळला. रत्नागिरीतील ५० वर्षांच्या व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. हा रुग्ण दुबईहून परतला असल्याचे समोर आले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -