घरमहाराष्ट्रनुकसानग्रस्त कोकणवासीयांना स्लॅबची पक्की घरे बांधून देणार

नुकसानग्रस्त कोकणवासीयांना स्लॅबची पक्की घरे बांधून देणार

Subscribe

 निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात रायगड, रत्नागिरी आणि काही प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त कोकणवासीयांना पुन्हा वादळाचा फटका बसू नये म्हणून पक्की स्लॅबची घरे देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिले आहे. पावसाळी आधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सल्लागार समितीची बैठक विधान भवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी ही माहिती दिली.

चक्रीवादळातून मुंबई वाचली, मात्र कोकणाला वादळामुळे मोठा फटका बसला आहे. त्यात कोकणातील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. ही चक्रीवादळे येत राहणार आहेत. त्यामुळे या नुकसानग्रस्तांना वादळाचा तडाखा बसू नये म्हणून हक्काचे पक्के स्लॅबचे घर दिले जाईल असे अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच यावेळी सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान चक्रीवादळाने मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, अहमदनगर अशा अनेक जिल्ह्यांना नुकसान पोहचवले असून, यासाठी एनडीआरएफने प्रत्येक कुटुंबाला कपड्यांसाठी आणि भांडी घेण्यासाठी प्रत्येकी अडीच हजार रुपये दिले जात होते. मात्र, राज्य सरकारने यासाठी आता प्रत्येकी 5 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

अंशतः पडझड झालेल्या घरांना 15 हजार रुपये, झोडप्यांसाठी 6 हजार रुपये दिले जात होते, आपण 15 हजार रुपये देणार आहोत. स्थानिक दुकानदारांना 10 हजार रुपयांपर्यंत मदत किंवा 75 टक्क्यांपर्यंत भरपाई दिली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच फळबागांसाठी शेतकर्‍यांना हेक्टरी 18 हजार रुपये दिले जायचे. आपण हेक्टरी 50 हजार रुपये मदत देणार आहोत. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शक्य ती मदत दिली जात आहे, असे अजित पवार म्हणाले.

एनडीआरएफने जाहीर केलेल्या मदतीच्या पुढे जाऊन राज्य सरकार मदत करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एवढेच नाही तर वादळाचा फटका बसलेल्या भागात वादळाने वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. ही यंत्रणा दुरुस्त करून वीज येण्यासाठी पुढील 15 दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात प्रत्येक रेशनकार्ड धारकाला मोफत लिटर रॉकेल दिले जाईल. तसेच तेथे प्रमुख आहार तांदूळ असल्याने त्यांना तांदूळही दिले जातील, असेही अजित पवार यावेळी म्हणालेत.

- Advertisement -

पूरग्रस्तांचा थकीत निधीही तात्काळ देणार –
गेल्यावर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. मात्र या भागातील काही नुकसानग्रस्तांना अद्यापही आर्थिक मदत मिळाली नसल्याच्या तक्रारीही आहेत. त्यामुळे ज्या नुकसानग्रस्तांचे पुराच्या नुकसानीचे पैसे देणे बाकी आहेत त्यांना तात्काळ पैसे दिले जातील. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत सूचना केल्या आहेत. यावर कॅबिनेटमध्येही निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -