घरमहाराष्ट्रमोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही लागणार का? मजदूर संघ सांगतो...

मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही लागणार का? मजदूर संघ सांगतो…

Subscribe

लोकल ट्रेनमधील मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. पण मध्य रेल्वे मजदूर संघने विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे मजदूर संघाने मोटरनची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील मोटरमन लॉबी येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमधील मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्याची माहिती मध्ये रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मध्य रेल्वेकडून सीसीटीव्ही कार्यान्वित करून चाचणी करण्याची सुरुवात केली आहे. या मध्य रेल्वे मजदूर संघने विरोध केला आहे.

यामुळे मध्य रेल्वे मजदूर संघाने मोटरनची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील मोटरमन लॉबी येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सीसीटीव्ही हा मोटरमन केबिनच्या मुख्य काचेसमोर लावण्यात येणार आहे. यामुळे मोटरमनचे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे आणि रूळ ओलांडणारे प्रवासी आणि सिग्नल यासारख्या अनेक गोष्टी लक्ष देत मोटरमन दररोज लाखो प्रवाशांचा सुरक्षित प्रवास घडवितात. यामुळे मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही लावण्यास विरोध करत असल्याचे मध्य रेल्वे मजदूर संघाने सांगतले.

- Advertisement -

हेही वाचा – मराठी पाट्या सक्तीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने व्यापारी संघटनांना दिला ‘हा’ सल्ला

मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही हा त्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा हा बाहेरच्या बाजूने लावण्यात येणार आहे. ज्यामुळे मोटरमनच्या वर्तनावर लक्ष ठेवून रेल्वेला सिग्नल जंपिंग आणि प्लॅटर्फॉर्म ओव्हरशूर्टिंगच्या घटना करमी करण्यासाटी ही यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.

- Advertisement -

रेल्वे मंडळाने स्थापन केलेल्या सुरक्षा समितीने 2016-17 मध्ये मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही लावण्याची शिफारस केली होती. यानुसार सिग्नल जंपिंग आणि रुळावरून घसरणे आणि मोटरमनचा मोबाईल फोन वापरण्यासारख्या घटना देखील वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जाते.

हेही वाचा – एखाद्या पूरग्रस्ताचे तोंड तात्पुरते बंद करू शकाल, पण…; ठाकरे गटाचा फडणवीसांवर निशाणा

मध्य रेल्वे मजदूर संघाच्या अध्यक्ष म्हणाले…

मोटरमनच्या कॅबिनमध्ये सीसीटीव्ही लावण्याच्या निर्णयावर मध्य रेल्वे मजदूर संघ मुंबई विभागाचे अध्यक्ष विवेक सिसोदिया म्हणाले, मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवल्याने ट्रेन मॅनेजर्सवर दबाव येऊ शकतो आणि त्यांच्या गोपनीयतेमध्ये हस्तक्षेप होऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -