Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र पुणे आगामी निवडणुका भाजप आणि शिवसेनेसोबत लढू; बीडच्या सभेत अजित पवारांचे वक्तव्य

आगामी निवडणुका भाजप आणि शिवसेनेसोबत लढू; बीडच्या सभेत अजित पवारांचे वक्तव्य

Subscribe

2 जुलै रोजी राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी झालेले अजित पवार आणि त्यांचे समर्थक यांचा समाचार घेण्यासाठी शरद पवार यांनी 17 ऑगस्ट रोजी बीडमध्ये स्वाभीमान सभा घेतली होती.

बीड : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या राष्ट्रवादी, भाजप-शिवसेने सोबतच लढवू असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीडमध्ये झालेल्या सभेत घोषित करून टाकला. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका निर्णय झाल्यानंतर कळवू असे म्हणत एकुणच आता राष्ट्रवादी(अजित पवार गट) महायुतीसोबतच निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Will fight upcoming elections with BJP and Shiv Sena; Ajit Pawar’s speech in Beed meeting)

2 जुलै रोजी राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी झालेले अजित पवार आणि त्यांचे समर्थक यांचा समाचार घेण्यासाठी शरद पवार यांनी 17 ऑगस्ट रोजी बीडमध्ये स्वाभीमान सभा घेतली होती. यावेळी अजित पवार गटावर सडकून टीका करण्यात आली होती. दरम्यान या सभेनंतर 27 ऑगस्ट रोजी अजित पवारांची आज सभा बीडमध्ये पार पडली. यावेळी अजित पवार यांनी परभणीच्या कार्यक्रमानंतर बीडमध्ये येऊन आधी स्व. विनायक मेटे यांच्या समास्थळी भेट दिली आणि नंतर मोठ्या शक्तिप्रदर्शनानंतर सभास्थळी पोहचले.

- Advertisement -

हेही वाचा : Gaganyaan Mission: चांद्रयान-3 च्या यशानंतर आता इस्रोची गगनयान मोहीम; अंतराळात पाठविणार रोबो

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो तर कुणी मित्र नसतो. हे राजकारण हे समजून घ्यावे. येथे बसलेले सगळे राजकारणी असून, राजकारण समजून घ्यावं. तर आम्ही घेतलेल्या निर्णयावर बोलले जाते, विरोधक काय टीका करतात यावर बोलून मी माझा वेळ घालवणार नाही. आम्ही राज्याच्या विकासाठी निर्णय घेतला असे म्हणत त्यांनी शरद पवार आणि त्यांच्या गटावर बोलणे टाळले.

फुले, शाहू-आंबेडकर विचार सोडले नाही

- Advertisement -

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, ज्या मधल्या काळात आम्ही निर्णय घेतला त्यानंतर आमच्यावर टीका केली जाते. मात्र, प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार येत असतात. आम्ही महापुरुषांना आदराचं स्थान देणारी माणसं आहोत. फुले शाहू आंबेडकरांचा विचार पुढे नेत आहोत. आम्ही महायुतीत जरी असलो तरी जातीय सलोखा टिकला पाहीजे यासाठी आम्ही करीत आहोत. आजच शासन आपल्या दारी हा कार्यक्रम परभणीत पार पडला. तुमच्याकडेपण होणार आहे. केंद्राच्या राज्याच्या योजना लोकापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला पाहीजे यासाठी आम्ही सत्तेत आलो आहोत असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा : कबुतर चोरीच्या संशयावरून तरुणाला अर्धनग्न करत झाडाला ठेवले बांधून; पटोले म्हणाले- हे गुजरात मॉडेल..

पीक विम्यापोटी राज्याच्या तिजोरीवर भार

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, बीड जिल्ह्यात पीकविम्याचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. मात्र आता नवीन पर्याय काढला. तो बीड पर्याय म्हणून ओळखल्या जाऊ लागला. आता एका रुपयांत पीक विमा काढल्या जातोय यामुळे राज्याच्या तिजोरीवर साडेचार कोटी रुपयांचा अधिकचा भार पडला आहे असे जरी असले शेतकऱ्यांसाठी हा निर्णय आम्ही घेतला असल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -