घरताज्या घडामोडीनवी मुंबईच्या विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव देऊ, उद्धव ठाकरेंचे प्रकल्पग्रस्तांना आश्वासन

नवी मुंबईच्या विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव देऊ, उद्धव ठाकरेंचे प्रकल्पग्रस्तांना आश्वासन

Subscribe

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांना दिले आहे.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत होती. त्यांच्या या मागणीला लवकरच ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे. कारण, नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांना दिले आहे. (Will give D.B. Patil name to Navi Mumbai International Airport, CM Uddhav Thackeray promise)

हेही वाचा  राज ठाकरेंच्या भूमिकेविरोधात आमदार राजू पाटील; दि.बा. पाटलांच्या नावासाठी रस्त्यावर उतरणार

- Advertisement -

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार होते. यासाठी सिडकोने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव केला होता. मात्र, स्थानिक भूमिपूत्र आणि स्थानिक सर्वपक्षीय कृती समिती प्रकल्पग्रस्तांनी या नावाला विरोध करून दि.बा.पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यासाठी भूमिपूत्रांनी आंदोलनही  पुकारले होते. दरम्यान, नवी मुंबईतील आंदोलकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर आज भेट घेतली. त्यावेळी, दि.बा. पाटील यांच्या नावाला हरकत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे आता लवकरच नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव मिळण्याची शक्यता आहे.


एकनाथ शिंदेंनी भांडण लावले

- Advertisement -

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळात योग्य माहिती प्रस्ताव सादर न केल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांच्यावर करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आंदोलक जमून शुक्रवारी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे सिडकोला घेराव घालण्यात आला होता. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

आगरी-कोळी-कराडी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर नवी मुंबईचे विमानतळ बनवण्यात येत आहे. त्यामुळे नवी मुंबईचे आमदार आणि खासदार राहिलेले दि.बा. पाटील यांचं नाव या विमानतळाला देण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, प्लॅनिंग ऑथोरिटी असलेल्या सिडकोने या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा ठराव केला होता. तसेच, राज्य सरकारही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही होती. मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन दिले आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -