घरमहाराष्ट्रसंभाजी भिडेंच्या विधानाची चौकशी करू - मुख्यमंत्री

संभाजी भिडेंच्या विधानाची चौकशी करू – मुख्यमंत्री

Subscribe

मनू हा संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे होता. संभजी भिडे यांच्या या याविधानवरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना पश्न विचारला . त्यावरून मुख्यमंत्र्यांनी चौकशी करू असे उचत्तर दिले आहे.

वारीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागपूरातील पावसाळी अधिवेशनामध्ये बोलत असताना विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी तसे निवेदन दिले. शनिवारी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालखीचे पुण्यात आगमन झाले. यावेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे देखील पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी केलेल्या भाषणात धर्माचार्य सध्या कसा होईल ते ज्ञानोबा, तुकोबांनी सगळ्या संत परंपरेने, ऋषीमुनी आणि तपस्वी लोकांनी आपल्याला शिकवलं आहे, मात्र मनू त्यांच्या पेक्षा हे एक पाऊल पुढे आहे. असे विधान संभाजी भिडे यांनी केले होते. याच मुद्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना पावसाळी अधिवेशनामध्ये प्रश्न विचारला. यावेळी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडे यांच्या विधानाची तपासणी करण्यात येईल. शिवाय तपासाअंती काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईदेखील करण्यात येईल असे निवेदन विधानसभेमध्ये दिले.

आंब्यामुळे अपत्यप्राप्ती होत असल्याचा दावा

लग्न होऊन १५ वर्षे झाली तरी जोडप्यांना मूल होत नाही. अशा जोडप्यांनी माझ्या शेतातील आंबा खाल्ल्यास त्यांनी नक्की मुलं होतील. आत्तापर्यत मी १८० पेक्षा अधिक जणांना आंबा खायला दिली असून त्यापैकी १५० जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली. ज्यांना मुलगा हवा त्यांना मुलगाच होईल अशी मुक्ताफळे संभाजी भिडे यांनी यापूर्वी उधळली होती. त्यावरून देखील मोठा वाद निर्माण झाला होता. तो वाद शमतो न शमतो तोच संभाजी भिडे यांनी वारीत सहभागी होत केलेल्या विधानावरून आता नवीन वाद निर्माण झाला आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -