पर्यावरण बदलाबाबत लवकरच ॲक्शन प्लॅन – आदित्य ठाकरेंची माहिती

देशात सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे निती आयोगाने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे.

पर्यावरणासाठी आराखडा तयार करणार असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्य मंत्रिमंडळात आयपीसीसीच्या वातावरणीय बदलाबाबतच्या अहवालावर चर्चा करण्यात आली आहे. या अहवालावर राज्य सरकार सकारात्मक असून पर्यावरण बदलाबाबत ॲक्शन प्लान तयार करण्याचे ठरवण्यात आले असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. पर्यावरण बदलाबाबत चर्चा सगळ्या विभागांना सोबत घेऊन करणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. शास्वत विकासाच्या विषयावर देखील राज्य मंत्रिमंडळात चर्चा करण्यात आली आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, मागच्या महिन्यात एक आयपीसीसी नावाच्या संस्थेने रिपोर्ट दिला होता. त्यांनी जगाला सांगितले की आपण असेच वागत राहिलो तर कार्बन फुट प्रिंटचा काय परिणाम होऊ शकतो. जर ते वाढले तर त्याचा दुष्परिणाम आपल्यावर आणि जगावर कसा होईल यावर चर्चा करण्यात आली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज्यासाठी स्टेट कॉउन्सिल फॉर क्लायमेट चेंज हे मंत्रिमडळाने बनवायला सांगितले आहे. या आराखड्यामध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष असतील उपमुख्यमंत्री सह अध्यक्ष असतील. पुढचा आराखडा सादर करुन राज्यातील महत्त्वाची खाती, उद्योग, युडी आरडीडी, ऊर्जा विभाग असेल या सगळ्यांना सोबत घेऊन प्रत्येक महिन्यात चर्चा करणार आहोत. या कामात कॅबिनेटचे पाठबळ लागणार आहे. सर्व विभागांनी सोबत असतील तर आपण वातावरणीय बदल आणि मीटिगेशन अडाप्शनसाठी महत्त्वाचे काम करु शकतो अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

सस्टेनबल डेव्हलपमेंट २०३०

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शास्वत विकास २०३० बाबतीत चर्चा झाली असल्याची माहिती दिली आहे. शास्वत विकासाच्या ध्येयाने कॅबिनेट नोट्स करत असतो. देशात सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे निती आयोगाने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे. शास्वत विकासाच्या ध्येयाने राज्य मंत्रिमंडळात निर्णय होत असतात. जे काही खातं राज्य मंत्रिमंडळ आणेल त्यामध्ये कोणते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे. याचा उल्लेख खाली असेल असा महत्त्वाचा निर्णय झाला असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. पुढील गोष्टींवर आराखडा तयार करुन पुन्हा एकदा मंत्रिमंडळासमोर सादर करणार असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : धक्कादायक! १८ महिन्यांच्या चिमुकल्याला मातेनेच केली अमानुष मारहाण; व्हिडिओ व्हायरल, महिलेला अटक