विकासकामांमध्ये कधीच दुजाभाव करणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन

शेतीतून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी शेतीत नाविन्यपूर्ण उपक्रम केले आहेत.

cm eknath shinde

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती आहे यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कराड मध्ये होते. कराड मध्ये मुख्यमंत्र्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी देखील कृषी प्रदर्शन होते त्यालाही मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली. प्रगतिशील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवीन आणि आमूलाग्र बदल घडविले यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. शेतकरी स्वयंपूर्ण होणे आणि शेतीतून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी शेतीत नाविन्यपूर्ण उपक्रम केले आहेत. नवनवीन पीक घेण्यासाठी शेतकरी आणि कृषी विभागाने जे प्रयत्न केले त्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक सुद्धा केले.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन सुद्धा केले आहे. उद्योग विभागाने ५०० एकर जागेत ऍग्रो इंडस्ट्री पार्क सुद्धा करण्यात येणार आहे याचा फायदा स्थानिक शेतकरी आणि नागरिकांना होणार आहे. त्याच सोबत जे विमानतळ आहे आहे लवकरात लवकर नाईट लँडिंग सुरु होईल यासाठी सुद्धा प्रयत्न सुरु आहेत. या सर्व कामांसाठी विकास निधी देण्यात आला आहे आणि या पुढेही शहराच्या कामासाठी विकास निधी कमी पडू देणार नाही असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराडमध्ये येण्यापूर्वी तिथल्या विकास कामांना निधी दिला आहे. यावरच मुख्यमंत्री म्हणाले, करतो, बघतो, सांगतो असं म्हणणारा मुख्यमंत्री नाही जी कामं पटकन होण्यासारखी होती ती मी केली. मी नगर विकास मंत्री होतो तेव्हाही मी विकासकामांसाठी निधी मंजूर करायचो आणि आता तर माझ्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे त्यामुळे विकासकामांमध्ये आमच्याकडून कधीच दुजाभाव होणार नाही. सर्वसामान्यांचे आणि सर्वसामान्यांसाठी हे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळेच आम्ही राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करत आहोत. असेही राज्याचे मुखमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


हे ही वाचा – पाणी द्या नाहीतर आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ; जत तालुक्यातील ४० गावांचा सरकारला अल्टिमेटम