घर देश-विदेश घाईत निर्णय घेऊन कोणावर अन्याय करणार नाही- राहुल नार्वेकर

घाईत निर्णय घेऊन कोणावर अन्याय करणार नाही- राहुल नार्वेकर

Subscribe

मुंबई : “कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही. पण कोणतीही घाई देखील होणार नाही. जेणेकरून गडबडीत निर्णय घेऊन कोणावर अन्याय करणार नाही”, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात दिली आहे. आज सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने तीन आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे.

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्हा दिले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टात कोणतेही कामकाज झाले नाही आणि पुढील तीन आठवड्यासाठी सुनावणी पुढे ढकलली.

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाने म्हटले की, आमदार अपात्रतेसंदर्भात वेगाने कारवाई यावी, यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्नावर राहुल नार्वेकर म्हणाले, “मी यापूर्वी देखील सांगितले की, कारवाई लवकरात लवकर होणार आहे. कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही. पण कोणतीही घाई देखील होणार नाही. जेणेकरून गडबडीत निर्णय घेऊन कोणावर अन्याय करणार नाही.”

हेही वाचा – शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने 3 आठवड्यांसाठी पुढे ढकलली

विधानसभा अध्यक्ष संवैधानिक पद

- Advertisement -

राहुल नार्वेकर म्हणाले, “यासंदर्भात माझ्यापर्यंत अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. मी सुप्रीम कोर्टात झालेल्या आदेशाची माहिती घेईन. यानंतर पुढची कारवाई काय असेल. याबद्दलचा निर्णय घेईन.” आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी दिरंगाई होते, असे मत सुप्रीम कोर्टाने नोंदविले, यावर पत्रकारांनी राहुल नार्वेकर प्रश्न केल्यावर ते म्हणाले, “माझ्या ऐकण्यात आले नाही. मी ऐकले की, सुप्रीम कोर्टाने म्हटले की, विधानसभा अध्यक्ष संवैधानिक पद आहे. यामुळे कोर्टात यासंदर्भात उल्लेख होणे अपक्षेति नाही.”

हेही वाचा – आमदार अपात्रता प्रकरणात वेळकाढूपणा का करताय? सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना सुनावले

कोणत्याही आदेशाची प्रत मिळालेली नाही

सुप्रीम कोर्टाने एका आठवड्यात निर्णय घेण्यास सांगितले, यावर राहुल नार्वेकर म्हणाले, “मला आतापर्यंत कोणत्याही आदेशाची प्रत मिळालेली नाही. मला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर त्या विषयी माहिती घेऊन, योग्य निर्णय घेईन.”

कागदपत्रांच्या पडताळीबाबत कारवाई सुरू

सुनील प्रभू आणि अनिल परब यांनी भेटले, यासंदर्भात राहुल नार्वेकर म्हणाले, “मला कोणी भेटण्यासाठी आले नाही आणि मला कोणी कोणतेही पत्र दिलेले नाही. मला जेवढी माहिती मिळाली की, कागदपत्रांच्या पडताळीबाबत कोणते तरी पत्र आले आहे. त्यासंदर्भात कार्यालयाकडून कारवाई सुरू आहे.”

- Advertisment -