पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले

bangladesh hikes petrol diesel price sent letter for loan to adb and world bank

येत्या काळात इंधन दरात कपात होण्याची शक्यता आहे. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude oil in international market ) दरात घसरण झाली आहे. मात्र, असे असले तरीही अद्यापही पेट्रोल-डिझेलच्या दरात (Prices of Petrol diesel) बदल झालेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

हेही वाचा – ‘या’ देशात मानवाकडून प्राण्याला मंकीपॉक्सचा संसर्ग; जगातील ही पहिली दुर्मीळ घटना

Indian Oil Corporationने जाहीर केलेल्या दरांनुसार आज पेट्रोल-डिझेलच्या दरात घट झालेली नाही. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर किंमत आहे. तर, दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

शहर    पेट्रोल    डिझेल

पुणे     १०५.८४  ९२.३६

कोल्हापूर  १०६.४७  ९३.०१

औरंगाबाद  १०७.९८  ९५.९६

परभणी   १०९.४१   ९५.८१

हेही वाचा – राज्यात 24 तासांत 836 कोरोना रुग्णांची नोंद, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.02 टक्के

तुम्हीही ऑनलाईन दर तपासू शकता

तुम्हाला नियमित बदलत जाणारे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घ्यायचे असतील तर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx यावर भेट द्या. किंवा IndianOil ONE Mobile App  यावरही तुम्हाला जवळच्या पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर कळू शकतील.

हेही वाचा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या नवे दर?

राज्यात सीएनजी पीएनजी कपात

महानगर गॅसकडून सीएनजीच्या दरात ६ रुपये प्रति किलो तर जीएनजीच्या दरात ४ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता आजपासून नवे दर लागू झाले आहेत. या दर कपातीमुळे मुंबईत सीएनजी ८० रुपये प्रति किलो इतका होईल. तर पीएनजी ४८.५० प्रति किलो इतका होईल.  सध्याचे हे दर पेट्रोलच्या तुलनेत ४८टक्के स्वस्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तर, पीएनजी हा एलपीजीच्या तुलनेत १८ टक्के स्वस्त असल्याचा दावा देखील कंपनीनं केला आहे. महानगर गॅस कंपनीकडून २ ऑगस्टला सीएनजी ६ रुपयांनी आणि पीएनजी ४ रुपयांनी वाढवला होता. परंतु त्यामध्ये आता कपात करण्यात आली असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.