वैद्यकीय महाविद्यालयात क्लासेस सुरू करणार, पण असणार ‘ही’ अट – अजित पवार

deputy cheif minister ajit pawar reation on wine selling in super market in Maharashtra
'वाईन आणि दारूमध्ये जमीन-अस्मानाचा फरक; विरोधक लोकांमध्ये पसरवतायत गैरसमज'

पुण्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा दिला. यादरम्यान अजित पवार यांनी वैद्यकीय महाविद्यालयात क्लासेस सुरू करायचा निर्णय राज्य स्तरावर घेऊन पाहतोय, अशी माहिती दिली. कारण सध्या कोरोनाच्या लढ्यात डॉक्टरांची सर्वाधिक गरज आहे. त्यामुळे पुढील काळात डॉक्टरांची कमतरता भासू नये, यामुळे क्लासेस सुरू करण्यावर विचार केला जात आहे.

अजित पवार म्हणाले की, ‘राज्यात जी वैद्यकीय महाविद्यालय आहेत, मग ती सरकार असतील किंवा खासगी असतील. त्या महाविद्यालयामध्ये क्लासेस सुरू करायचे, असा निर्णय आम्ही राज्य स्तरावर घेऊ पाहतोय. पण अट अशी आहे की, तिथल्या विद्यार्थ्यांनी, तिथल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन डोस घेतले पाहिजेत. जर मेडिकल कॉलेज बंद ठेवली तर दरवर्षी काही हजार डॉक्टर बाहेर पडतात, तर ते पडणार नाहीत. त्यामुळे डॉक्टरांची जी संख्या जास्त पाहिजे, त्यात कमतरता भासू लागेल. म्हणून यासंदर्भात मी आता पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव आणि इतर लोकांशी बोललो आहे.’

दरम्यान आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी केली होती. यामाध्यमातून ३०६ वारकऱ्यांची ससून रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यापैकी २३ वारकरी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, पण यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसून आली नाही आहेत. सध्या या वारकऱ्यांना रुग्णालयात दाखल केले गेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.


हेही वाचा – Pune Corona Update: पुणेकरांसाठी मॉल्स बंदच – अजित पवार