स्वतंत्र शिंदे गटाला लवकरच नवीन नावाने मान्यता, 3 जुलैला नवं सरकार येणार-सूत्र

तसेच एकनाथ शिंदे ही लढाई विधानसभा आणि कायदेशीररीत्या लढणार आहेत. आपल्या गटाच्या हालचाली जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आज प्रवक्त्यांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी शिंदे गटाची एक बैठकही होणार आहे

eknath shinde

मुंबईः एकनाथ शिंदेंच्या बंडानं राज्याच्या राजकारणात मोठ्या उलाढाली घडत आहेत. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगात राज्याचे राजकारण कोणत्या दिशेने वळण घेणार हे कोणालाच माहीत नाही. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावर कुरघोडी करण्याचा आणखी एक मास्टरस्ट्रोक एकनाथ शिंदे यांच्या गटाने केला आहे.

शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून आता शिवसेनेत बाळासाहेब गट आणि दुसरा (उद्धव) गट असे दोन गट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत यातून अधिकाधिक शिवसैनिक आपल्या गटाशी भावनिकरीत्या जोडले जातील, असा एकनाथ शिंदे गटाचा अंदाज आहे. तसेच एकनाथ शिंदे ही लढाई विधानसभा आणि कायदेशीररीत्या लढणार आहेत. आपल्या गटाच्या हालचाली जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आज प्रवक्त्यांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी शिंदे गटाची एक बैठकही होणार आहे. त्यामुळे आता ही लढाई सर्वोच्च न्यायालयात लढली जाणार असून, शिंदे गटाला मान्यता मिळण्याचाही अंदाज कायदेतज्ज्ञ वर्तवत आहेत. तसेच भाजप आणि शिंदे गटाचं सरकार स्थापन करण्यासाठी 3 जुलैचा मुहूर्त ठेवण्यात आला असल्याचीही विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळालीय.

शिवसेना नेमकी कोणाची हा वाद विधानसभेसह कोर्टात पोहोचला असून, दोन्ही गटांकडून कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. तसेच नरहरी झिरवळांना अधिकार घेण्याचा निर्णय आहे का? याचीसुद्धा चाचपणी केली जात आहे. तसेच झिरवळांनी 16 आमदारांच्या अपात्रतेची मागणी करण्यासाठी 7 आमदार फुटल्यामुळे कायदेशीर बाबींवर जोर दिला जाणार आहे.

काही कायदेतज्ज्ञांच्या मते, घटनेच्या दहाव्या परिशिष्ट नुसार विलीनीकरण हा शब्द वापरला आहे, परंतु विभाजन हा शब्द 2003 च्या दुरुस्तीनुसार काढून टाकण्यात आलेला आहे. या विलीनीकरणाच्या तरतुदीनुसार संपूर्ण गटाला दोन तृतीयांश बहुमताने म्हणजेच 37 आमदारांच्या पाठिंब्याने दुसऱ्या पक्षामध्ये विलीन करावे लागेल किंवा त्यांचा वेगळा गट स्थापन करावा लागेल. पण एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आमदार भाजपमध्ये विलीन होण्यास तयार आहेत का? जर असतील तरच त्यांची अपात्रता टळण्याची शक्यता आहे. तसेच त्यांना नवीन पक्ष अथवा गट काढावा लागेल. परंतु मूळ शिवसेना ही ओळख मिळवणे त्यांना अवघड असल्याचंही सांगितलं जात आहे.


हेही वाचाः ठरलं! शिंदे गटाचं नाव ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, लवकरच घोषणा होणार