आज युवासेनेची बैठक, बंडखोर आमदारांचे पुत्र हजर राहणार का?

या बैठकित कार्यकारिणी सदस्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बंडखोर आमदारांचे पुत्र युवासेनेच्या कोअर कमिटीमध्ये आहेत.

aditya thackeray

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आज युवासेनेने तातडीची कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. आज, रविवारी सायंकाळी सहा वाजता ही बैठक होणार असून या बैठकीत बंडखोर आमदारांचे पुत्र हजर राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Will the sons of rebel MLAs be present at today’s Yuvasena meeting?)

हेही वाचा – ‘कब तक छीपोगे…’, झिरवळांचा फोटो शेअर करत संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला

शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. त्यानंतर युवासेनेनेही आज सेनाभवनात तातडीने बैठक आयोजित केली आहे. या बैठकित कार्यकारिणी सदस्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बंडखोर आमदारांचे पुत्र युवासेनेच्या कोअर कमिटीमध्ये आहेत. आमदार योगेश कदम यांचा भाऊ सिद्धेश कदम, आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र  समाधान सरवणकर, प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक हे युवासेनेच्या सचिव पदावर कार्यरत आहेत. तर, आमदार यामिनी जाधव यांचा मुलगा निखिल जाधव हा युवासेनेच्या सिनेट सदस्यांमध्ये आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी आजच्या बैठकीला येणार की गैरहजर राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या बैठकीत काही प्रस्ताव ठेवण्यात येणार आहेत. मात्र कोणते राजकीय ठराव मंजूर केले जातात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा  – बंडखोर आमदारांच्या मुक्कामात वाढ; ३० जूनपर्यंत गुवाहाटीतच राहणार

दरम्यान, शुक्रवारी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षाचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत. तसेच, या बैठकीत अनेक ठरावही मंजूर करण्यात आले.