घरमहाराष्ट्रवंचितला महाविकास आघाडीत घेणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

वंचितला महाविकास आघाडीत घेणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Subscribe

Sharad Pawar on VBA | शिवसेना हा पक्ष महाविकास आघाडीचा घटकपक्ष असल्याने आगामी निवडणुकांमध्ये वंचितसोबत जागावाटपाचा काय फॉर्म्युला असणार, वंचितला महाविकास आघाडीत स्थान मिळणार का असे प्रश्न उपस्थित केले जात होते.

Sharad Pawar on VBA | मुंबई – वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि शिवसेना (Shivsena) या दोन पक्षांची युती झालेली असली तरीही वंचित पक्ष महाविकास आघाडीचा (Mahavikas aghadi) भाग नाही. त्यामुळे वंचितलाही महाविकास आघाडीत घेणार का असा प्रश्न शरद पवारांना (Sharad Pawar) विचारला असता ते म्हणाले की, याबाबत वंचितकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं स्पष्ट केलं. आज शरद पवारांनी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली होती. तसंच, ही युती शिवसेनेसोबत असून महाविकास आघाडीसोबतची नाही हेही स्पष्ट कऱण्यात आलं होतं. मात्र, शिवसेना हा पक्ष महाविकास आघाडीचा घटकपक्ष असल्याने आगामी निवडणुकांमध्ये वंचितसोबत जागावाटपाचा कसा फॉर्म्युला असणार, वंचितला महाविकास आघाडीत स्थान मिळणार का असे प्रश्न उपस्थित केले जात होते.

- Advertisement -

हेही वाचा – स्थानिक संस्थांमध्येही आता शिवशक्ती-भीमशक्तीची युती, शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित आघाडीत पक्ष प्रवेश

महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार आजही भाजपाचेच आहेत, असा मोठा दावा त्यांनी केला होता. यावरून गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. या सर्व वादावर शरद पवारांनी प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. परंतु, त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीत यायचं की नाही याबाबत वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तसंच, याबाबत प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चाही झालेली नाही, असं शरद पवार म्हणाले. तसंच, जागावाटपाबाबत विचारले असता जागावाटपाची चर्चा इतक्यात नको, असंही पवार म्हणाले.

तसंच, आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सी व्होटर सर्व्हे खरा असल्याचंही म्हटलं आहे. सी व्होटरचा सर्व्हे सत्ताधाऱ्यांना खरा चेहरा दाखवणारा असून आगामी निवडणुकीत सत्ताधारी बहुमताचा आकडा सिद्ध करू शकणार नाहीत. बहुमताचा आकडा सत्ताधाऱ्यांसोबत राहणार नाही, असा दावाही पवारांनी केला आहे.

हेही वाचा – शरद पवार आजही भाजपसोबतच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -